Pune Crime | प्रेयसीचं ‘झेंगाट’ मॅनेजरशी असल्याचा संशय, जाब विचारताना झालेल्या वादात मित्राचा खून; पुण्याच्या लोकमान्यनगरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेयसीवरील (Girlfriend) संशयावरुन तिच्या मॅनेजरला जाब विचारल्याने त्यांच्यात वाद झाला. तेव्हा तरुणीने आपल्या मामांना बोलावले. ते प्रियकराला (Boyfriend) मारहाण (Beating) करीत असल्याचे पाहून त्याचा मित्र भांडणे सोडविण्यास आला, तेव्हा त्याला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना लोकमान्यनगर (Lokmanya Nagar) पोस्ट ऑफिससमोर (Post Office) शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजता घडली. याप्रकरणी 5 ते 7 जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) खूनाचा गुन्हा (Murder In Pune) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

गणेश गायकवाड Ganesh Gaikwad (वय २१, रा. दत्तवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरूणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी (Pune Police) 5 ते 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 22 वर्षीय तरूणाचे एका तरुणीवर प्रेम संबंध (Love Affair) आहेत. ही तरुणी जेव्हा काम करते, तेथील मॅनेजरबरोबर तिचे सुत जुळल्याचा फिर्यादीला संशय होता. त्यामुळे तो त्यांचा पाठलाग करत असे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास या मॅनेजरने या तरुणीला लोकमान्यनगर येथील पोस्ट ऑफिससमोर मोटारसायकलवरुन सोडले. त्यानंतर फिर्यादीने पुढे जाऊन या मॅनेजरला अडविले व तुझे तिचे काय आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आमच्यात काही नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. ही तरुणीही तेच सांगण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावरुन फिर्यादी आणि मॅनेजर यांच्यात भांडणे सुरु झाली. तेव्हा या तरुणीने आपल्या मामांना फोन करुन बोलावले. तरूणीचे मामा आणि इतर ४ ते ५ जण आले. त्यांनी फिर्यादीच्या पोटात तलवारीने वार (Sword Strike) केले. आपल्या मित्राला मारत असल्याचे पाहून गणेश हा मध्ये पडला. तेव्हा आरोपींनी गणेश याच्या मानेवर तलवारीने वार केले. गंभीर जखमी झालेल्या गणेश याचा जागीच मृत्यु झाला.

 

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी पोहचले.
त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले असून खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title :-Pune Crime | boyfriend have Suspicion of having relationship with the manager on his girlfriend murder of a friend in an argument while asking something Incident in Lokmanya Nagar Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा