Supriya Sule On Amruta Fadnavis | ‘मी अमृता फडणवीस यांना ट्विटरवर फॉलो करत नाही’ – सुप्रिया सुळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule On Amruta Fadnavis | देशात पेट्रोल – डिझेलचे (Petrol Diesel Price Hike) भाव गगनाला भिडले आहेत. खाद्यतेल, घरगुती गॅस सिलेंडरच्या (Domestic Gas Cylinders Price Hike) दरांमध्ये वाढ झाली आहे. सामान्य जनतेतही केंद्र सरकारविरोधात असंतोष आहे. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना राज्यातील काही विषयांवर प्रश्न केला असता त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना महागाईचं आव्हान सोडून मला काही सूचत नसल्याचं म्हटलं आहे.

 

मला इतकी कामं असतात की मला माझ्या जबाबदाऱ्यांमधून बाकी काही करायला वेळ मिळत नाही.
माझ्यासमोर सर्वात मोठं आव्हान हे महागाईचं आहे,
महागाईचं सर्वात मोठं आव्हान समोर असताना मला काही सुचत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला होता.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारलं असता,
मी अमृता फडणवीस यांना ट्विटरवर फॉलो करत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Supriya Sule On Amruta Fadnavis)

 

दरम्यान, राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असताना उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांनी भोंगे लावण्यासाठी नियमावली लागू केली आहे.
यावरून, “ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”, असं म्हणत अप्रत्यक्षपणे अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.

 

Web Title :- Supriya Sule On Amruta Fadnavis | ncp supriya sule replied amruta fadnavis over criticism on maha vikas aghadi on loudspeaker on masjid

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा