Pune Crime Branch Police | बांधकाम व्यावसायिकांना माहिती अधिकार कायद्याची भीती दाखवत 1 कोटीची खंडणी मागणाऱ्या अ‍ॅड. राजेश बजाज, बापू शिंदेला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch Police | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना माहिती अधिकार कायद्याची भीती दाखवत लाखो रूपयांची खंडणी मागीतल्याचा (Ransom) प्रकार उघडकीस आला होता. तसेच खंडणी दिली नाहीतर बदनामी करण्याची धमकी आरोपी राजेश बजाज आणि बापू शिंदे यांनी बांधकाम व्यावसायिकास दिली होती. याप्रकरणी पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथक (Anti-ransom squad) दोनने आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.दरम्यान, आरोपी बजाजने फिर्यादीकडे उच्च न्यायालयातील दावा परत घेण्याकरिता 1 कोटी रूपयांची खंडणी मागितली होती तसेच त्यांना संपविण्याची धमकी देखील दिली होती.

बांधकाम व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेश उर्फ बॉबी खैरातीलाल बजाज उर्फ सचदेव
Rajesh alias Bobby Khairatilal Bajaj alias Sachdev (रा. अंकुर सोसायटी, कमला नेहरु पार्क, शिवाजीनगर) आणि बापू गोरख शिंदे Bapu Gorakh Shinde (रा. मानाजीनगर, नऱ्हे रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
हा प्रकार डिसेंबर 2019 ते 16 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला होता.

Modi Government | दुचाकीवर 4 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हेल्मेट सक्ती? मोदी सरकारने सूचना अन् हरकती मागवल्या

गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथकाला मुख्य आरोपी राजेश बजाज हा एम.जी. रोडवरील लष्कर न्यायालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सापळा रचून बजाज याला अटक केली आहे.
तर दुसरा आरोपी बापू शिंदे याला नऱ्हे येथून अटक करण्यात आली आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी विरोधात डेक्कन (Deccan Police Station), कोरेगाव पार्क (Koregaon Park Police Station) आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2 असे एकुण चार गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे
(Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhre),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), अंमलदार सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, प्रविण पडवळ, संग्राम शिनगारे, विजय गुरव, संपत औचरे, सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

हे देखील वाचा

जर तुमचे सुद्धा असेल PNB मध्ये खाते तर होईल 15 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा

Anti Corruption Bureau Mumbai | 15 हजारीची लाच मागणारे अंमली पदार्थ विरोधी पथकातील 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime Branch Police | Adv. Rajesh Bajaj, Bapu Shinde arrested by pune police Crime Branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update