Pune Crime | कोंढव्यात हुक्का पार्लरवर छापा, मालकासह मॅनेजरविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सामाजिक सुरक्षा विभागासह अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा परिसरात (Kondhwa) हॉटेल क्लब 24 दोराबजीमध्ये (Hotel Club 24 dorabjee) सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकला. या कारवाईत 4 चिलीम आणि इतर साहित्य असा 36 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकविरूद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती की, महमदवाडीतील हॉटेल क्लब 24 दोराबजीमध्ये (Hotel Club 24 dorabjee) अवैध हुक्काबार सुरू आहे. या माहितीनुसार, पथकाने सापळा रचून छापा टाकला असता हॉटेल मालक अमर खंडेराव (रा. महमदवाडी) आणि मॅनेजर विक्रम सुखदेव जाधव ( वय 30) हे हुक्काबार चालवत असल्याचे आढळले.

याप्रकरणी हुक्काबार मालक आणि मॅनेजरविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title :- pune crime branch police raid on hookah bar in kondhwa area, manager and owner booked

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime | दोघा भावांवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला; नाशिक शहरातील खळबळजनक घटना, Video व्हायरल

Pune Crime | 58 गुंठे जमीन बळकवण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीच्या गुन्ह्यातील संशयित नितीन हमनेचा जामीन मंजूर

Energy Policies | शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, ‘हे’ 4 देश करतील जगाचा विध्वंस; महाविनाश रोखण्यासाठी घ्यावी लागेल ‘अ‍ॅक्शन’