Energy Policies | शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, ‘हे’ 4 देश करतील जगाचा विध्वंस; महाविनाश रोखण्यासाठी घ्यावी लागेल ‘अ‍ॅक्शन’

नवी दिल्ली : Energy Policies News | शास्त्रज्ञांनी एक इशारा जारी करत म्हटले आहे की, चार असे देश आहेत जे जगासाठी अतिशय धोकादायक बनत चालले आहेत. जर त्यांना रोखले गेले नाही तर जग बरबाद होण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही. (Energy Policies News) या चार देशांची नावे आहेत, ऑस्ट्रेलिया, चीन रशिया आणि ब्राझील.

हे चार देश जी-20 चे सदस्य आहेत, परंतु त्यांच्या भविष्याच्या योजना आपल्या पृथ्वीसाठी विचारापेक्षा सुद्धा जास्त धोकादायक आहेत. शास्त्रज्ञांनी अतिशय गंभीर इशारा जारी करत म्हटले आहे की, चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमध्ये जे उर्जा धोरण तयार करण्यात आले आहे ते आपल्या पृथ्वीसाठी महाविनाशकारी ठरू शकते, यासाठी त्यांना ताबडतोब रोखले जावे.

जग बरबाद करणारा प्लान

पीयर रिव्ह्यू ग्रुप पॅरिस इक्विटी चेककडून अतिशय गंभीर चिंता आणि इशारा जारी करण्यात आला आहे आणि म्हटले आहे की या चार देशांनी जगातील तमाम जलवायु परिवर्तनबाबत करण्यात आलेल्या करारांकडे दुर्लक्ष करून अनेक अशा योजनांवर काम सुरू केले आहे, ज्याचे परिणाम विनाशकारी असतील.

Energy Policies | china russia brazil australia disastrous energy policies stoke 5c rise in temperature warn scientist

पॅरिसमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणारे जगातील सर्वात मोठे जलवायु परिवर्तन संमेलन ’सीओपी-26’ मध्ये सुद्धा हा मुद्द उपस्थित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ’सीओपी-26’ जागतिक इतिहासाचा सर्वात मोठी क्लायमेट चेंज कॉन्फरन्स होईल, ज्यामध्ये जगातील तमाम देश सहभागी होतील.

सीओपी-26चा हेतू 2050 पर्यंत जागतिक जलवायु तापमान 1.5 डिग्री सेल्सियसपर्यंत कमी करण्यासाठी योजना बनवण्याचा आहे. परंतु, शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की जगातील तमाम देश मिळून ज्याप्रकारे निसर्गासोबत छेडछाड करत आहेत, या लक्ष्यापर्यंत पोहचणे अशक्य आहे.

प्रत्येक इशार्‍याकडे केले दुर्लक्ष

यूरोपीय यूनियन आणि ब्रिटनने कार्बन उत्सर्जनबाबत शपथ घेतली आहे की ते कोणत्याही स्थितीत
अशा योजना सुरू करणार नाहीत, ज्यामुळे जगात प्रदूषण आणि तापमान वाढेल. परंतु रिपोर्ट आहे की चीन, रशिया, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाने सर्व नोटिफिकेशन आणि इशार्‍यांकडे दुर्लक्ष केले आहे. ’पीयर रिव्ह्यू ग्रुप पॅरिस इक्विटी चेक’च्या रिपोर्टनुसार, या देशांमध्ये कोळशाचा भीषण स्तरावर वापर केला जात आहे.

जर पूर्ण जगातील सर्व देश या चार देशांप्रमाणे कोळशाचा आणि जीवाश्म इंधनाचा वापर करू लागले
तर, ताबडतोब जगाचे तापमान 5 डिग्री सेल्सियस वाढेल, ज्याचा अर्थ प्रलय असेल. परंतु, हे चार
देश सोडले तर सर्व देश जगाच्या प्रति आपली जबाबदारी दाखवत आहेत, तर हे चार देश बेजबाबदार
होत कोट्यवधी टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन करत आहेत.

2050 पर्यंत होईल भयानक स्थिती

सीओपी-26 ने जे लक्ष्य ठेवले आहे की आपल्याला 2050 पर्यंत जगाचे तापमान 1.5 डिग्री
सेल्सियस कमी करायचे आहे, ते लक्ष्य पूर्ण केले जाऊ शकत नाही, परिणामी 2050 अतिशय
धोकादायक ठरू शकते.

हे देखील वाचा

Maharashtra Flood | पूरग्रस्त भागात मृत्यूतांडव ! 164 जणांचा मृत्यू, 25 हजार 564 जनावरं दगावली

Pune Crime | पुणे कॅन्टोंमेंट बोर्डाचा माजी नगरसेवक विवेक यादवनं सीम कार्ड दिली वाशीच्या खाडीत फेकून, पोलीस कोठडीत वाढ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Energy Policies | china russia brazil australia disastrous energy policies stoke 5c rise in temperature warn scientist

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update