Pune Crime Branch | पुणे : सराईत मोबाईल चोर गजाआड, गुन्हे शाखा युनिट 5 ची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आणि भाजी खरेदी करणाऱ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या (Arrest In Mobile Theft) सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून 55 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त करुन पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई 23 मार्च रोजी कोंढवा येथील शितल पेट्रोल पंपाजवळ (Sheetal Petrol Pump Kondhwa) केली. परवेश रहमान शेख (वय-40 रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Pune Crime Branch)

गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी मोबाईल चोरणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार परवेझ शेख शितल पेट्रोल पंपाजवळ चोरलेले मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेऊन पाच मोबाईल जप्त केले. परवेझ याच्याकडे केलेल्या तपासात त्याने कोंढवा येथील एका घराचा दरवाजा उघडा असताना मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हडपसर येथे बसमध्ये व भाजी मार्केटमधील नागरिकांच्या हातातील मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम (PI Ulhas Kadam),
पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहटे (PSI Avinash Lohte), पोलीस अंमलदार राजस शेख, प्रमोद टिळेकर, दया शेगर,
पृथ्वीराज पांडुळे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे व राहुल ढमढेरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Parvati Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी गजाआड

Kangana Ranaut-Mandi Lok Sabha | कंगना रनौतला भाजपकडून उमेदवारी जाहीर, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

Mahavikas Aghadi-Shivsena | आज मविआची निर्णायक बैठक, उद्या शिवसेना उमेदवारांची पहिली यादी येणार, जाणून घ्या संभाव्य नावे

Maval Lok Sabha | महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’! मावळमध्ये सुद्धा शिंदे गट आणि राष्ट्रवादीत वादावादी, तटकरेंना कडेलोटाचा इशारा