Pune Crime | एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करून मारहाण; तरुणाला अटक

पुणे : Pune Crime | तरुणी जाईल तेथे जाऊन तिचा पाठलाग करुन तिच्याशी जवळीक साधत प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. तिने त्यास नकार देताच तिला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

हर्षित प्रसन्ना शर्मा Harshit Prasanna Sharma (वय 21, रा. कवाडेवस्ती, खांदवेनगर, लोहगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime)

याबाबत वाघोली येथील एका 21 वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 387/22) दिली आहे. हा प्रकार जून 2022 पासून सुरु होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहे. आरोपी हा एका कंपनीत नोकरीला आहे. त्याने फिर्यादी तरुणीशी मोबाईलवरुन संपर्क करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी तिचा पाठलाग केला. 8 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजता फिर्यादी या हॉटेलमधून बाहेर आल्या होत्या. तेव्हा त्याने तु माझ्याशी प्रेम का करत नाही, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करीत मारहाण केली. तिचा पाठलाग करुन बोलण्याचा व जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळून या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी हर्षीत शर्मा याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कोळ्ळुरे (Sub-Inspector of Police Kollure) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Chasing and beating a young woman out of one-sided love; Youth arrested crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा