Pune Crime | TC चा काळा कोट अन्….. रेल्वेत नोकरी लावण्याचं आमिष, दोघी अटकेत

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रेल्वे विभागात नोकरी लावतो असे सांगून लाखो रुपये लुटणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात निगडी पोलिसांना (Nigdi Police Station) यश आले आहे. माधुरी संदीपान पवार (मूळगाव बेलवडे ता.कराड जि. सातारा) व संजीवनी निलेश पाटणे (रा. नेसरी ता. गडिंग्लज जि. कोल्हापूर) अशी अटक (Pune Crime) करण्यात आलेल्या महिलांची नावे असून या प्रकरणी सुमित्रा घुले (रा निगडी) यांनी तक्रार दिली होती.

पिंपरी-चिंचवड शहराचे उपायुक्त मंचक इप्पर (dcp manchak ipper) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित्रा घुले यांचे निगडी येथे ब्युटी पार्लर आहे. तेथे माधुरी नेहमी जात होती. काही दिवसानंतर माधुरी आणि सुमित्रा यांची चांगलीच मैत्री झाली. त्यानंतर माधुरीने आपण रेल्वे विभागात तिकीट चेकर असल्याचे सांगत सुमित्रा यांचा विश्वास संपादन केला. इतकंच नाही तर यासाठी माधुरीने टीसी चे कपडे, आयकार्डही दाखवले. दरम्यानच्या काळात माधुरीने पुण्याच्या रेल्वे विभागातील डीएमआर कार्यालयात (DMR Railway Office) माझी मैत्रीण संजीवनी पाटणे ही देखील कामाला आहे. आम्ही तुम्हाला रेल्वेत नोकरी लावू शकतो, असे सांगितले. त्यानंतर सुमित्रा यांनी स्वतःची शैक्षणिक कागदपत्रे आणि ८ लाख ५०हजार रुपये माधुरीला दिले. त्यानंतर बरेच दिवस उलटून गेले. पण नोकरीचा कॉल काही सुमित्रा यांना आला नाही. त्यानंतर त्यांनी माधुरीशी संपर्क साधला पण तिनेही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवस गेल्यानंतर आपली फसवणुक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी निगडी पोलिसात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी माधुरी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणच्या आधारावर निगडी पोलिसांनी माधुरीला ताब्यात घेतले. सुरुवातीला माधुरीने चौकशीसाठी सहकार्य केले नाही. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच माधुरीने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या माहितीनुसार यामध्ये संजीवनीचाही सहभाग होता तिलाही पोलिसांनी (Pune Crime) ताब्यात घेतले. तिच्या घराची झडती घेतली असता १० लोकांचे शैक्षणिक कागदपत्रे, रेल्वे विभागाचे बनावट ओळखपत्रे, T.C च्या गणवेशासह बनावट नंबराचे बिल्लेही आढळून आले . पोलिसांनी ते सर्व जप्त केले.

माधुरी आणि संजीवनी यांनी केवळ सुमित्रा घुले यांनाच नाही तर अन्य दोन महिलांचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्या दोघींनाही तक्रार दिली असून माधुरी आणि संजीवनी यांनी १८ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर या दोघींवर सांगलीमध्येही गुन्हा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान घराच्या झडतीमध्ये ज्या १० लोकांची कागदपत्रे आढळली आहेत त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे या दोघींनी आणखी काही लोकांना फसवले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Web Title : Pune Crime | cheating woman by offering job in railways 2 women accused arrested pimpri chinchwad police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये