×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | कंपनीत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, युनीट सहाची कामगिरी; 12...

Pune Crime | कंपनीत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, युनीट सहाची कामगिरी; 12 गुन्हे उघडकीस

पुणे – Pune Crime | कंपनीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला युनीट सहाने अटक (Arrest) केली. त्यांनी लोणीकाळभोर परिसरातून विद्युत ट्रान्सफॉर्मर Electric Transformer ( डीपी) मधील तांब्याच्या तारा चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून अडीच लाखांच्या 584 किलो तांब्याच्या तारा जप्त केल्या आहेत. (Pune Crime)

अजय मांगीलाल काळे Ajay Mangilal Kale (वय २५ इनामगाव ता. शिरुर), रोहित रामदास वाजे Rohit Ramdas Waje (वय २७, जुना मोशी आळंदी रोड), वचिष्ठ श्रीमंत मुंढे Vachishta Shrimant Mundhe (वय २१, केसनंद वाघोली रोड, केसनंद, पुणे, मुळगाव वडवणी ता. वडवणी जि. बिड), कुमार नामदेव शेलार Kumar Namdev Shelar (वय २२, रा. वाघोली), सुरज भैरवनाथ चौगुले Suraj Bhairavnath Chaugule (वय २३, रा. आव्हाळवाडी), सुनिल कोळप्पा विटकर Sunil Kolappa Witkar (वय ३४, वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

गुन्हे शाखा (Pune Police Crime Branch) युनीट सहाचे पथक २६ सप्टेंबरला पेट्रोलिंग करीत असताना घरफोडी करणारा वाघोलीत थांबल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल (Senior Police Inspector Rajnish Nirmal) यांना माहिती देउन पथकाने त्याठिकाणी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी ग्रामीण भागामध्ये लोड शेडींगचा फायदा घेऊन लोणीकंद व लोणी काळभोर भागात विद्युत ट्रान्सफॉर्मर (डीपी) मधील ऑईल आणि तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून 584 किलो तांब्याचे तारा जप्त करीत १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सहआयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर आयुक्त रामनाथ पोकळे
(Additional Commissioner Ramnath Pokle), उपायुक्त श्रीनिवास घाडगे
(Deputy Commissioner Srinivas Ghadge), एसीपी नारायण शिरगांवकर
(ACP Narayan Shirgaonkar), उपनिरीक्षक सुरेश जायभाय (Sub Inspector Suresh Jaibhai),
उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके (Sub-Inspector Bhairavanath Shelke), मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर,
कानिफनाथ कारखेले, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर,
शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, अशफाक मुलाणी, सुहास तांबेकर यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Company robbery gang jailed, Unit Six performance; 12 Crime detection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा, म्हणाले-‘कायदा मोडला तर…’ (व्हिडिओ)

Maharashtra Political Crisis | शिवसेना, विश्वासघात अन् काँग्रेस; तेव्हा वसंतसेना म्हणून शिवसेनेला हिणवले जायचे

Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या धडकेत पाच जण जागीच ठार

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News