Pune Crime | पुण्यात लग्नाच्या दिवशीच नवरी मुलीसह चौघांविरूध्द गुन्हा; स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून केलं होते फोटो, व्हिडीओ शुटिंग (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |लग्नाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील नवरी मुलगी आणि तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाला आहे. तिला आणि तिच्या कुटुंबाला अतिउत्साह अंगलट आला आहे. दिवे घाटात नवरी मुलगी चक्क गाडीच्या बोनेटवरून बसून फोटो आणि व्हिडीओ शूट करत होती आणि त्याचाच व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी (loni kalbhor police station) मात्र काही तासात शोध घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी नवरी मुलगी (वय 23, रा. भोसरी) इतर तिघे आणि स्कार्पिओमधील इतर दोन यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात IPC 269, 188, 279, 107, 336, 34 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 ब, महाराष्ट्र कोविड उपाय योजना 2020 चे कलम 11 मो.व्हॅ. अ‍ॅक्ट 119/177,184 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

नवरी मुलगी (वय 23, रा. भोसरी) हिचा आज सासवड येथे विवाह आहे. त्यासाठी ती आणि तिचे नातेवाईक भोसरीमधून स्कार्पिओतून सासवड येथे जात होते. यावेळी त्यांनी दिवे घाटात आल्यानंतर फोटो शूट केले. पण, त्यांचे हे फोटो शूट करत असताना गाडीच्या बोनेटवर बसून, काही अंतर जात असतानाचा फोटो देखील काढला. हे फोटो सेशन सुरू असताना मात्र कोणीतरी त्याचा एक व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला आणि तो व्हायरल केला. त्यानंतर पुण्यात खळबळ उडाली.

लागलीच लोणी काळभोर पोलिसांनी (loni kalbhor police) या व्हिडीओचा शोध घेण्यास सुरुवात केली.
त्यानंतर काही तासात समजले की नवरी मुलगी जात असताना हे घडले आहे.
त्यानंतर लागलीच पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आज विवाह असल्याने पोलिसांनी त्यांना तोंडी कारवाईची माहिती दिली आहे.
विवाह झाल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
अधिक तपास लोणी काळभोर पोलीस (loni kalbhor police) करत आहेत.

Web Titel :- Pune Crime | Crime against four including bride and groom on their wedding day in Pune; Sitting on the bonnet of Scorpio was done photo, video shooting (Video)

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lightning | वीज कोसळल्याने देशात 78 लोकांचा गेला बळी; पीएम मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

Smartphone | जर तुमची मुले सुद्धा जास्त मोबाइल पहात असतील तर ‘या’ 6 टिप्सचा करा वापर, जाणून घ्या

Thane Crime News | धक्कादायक ! चक्क रक्ताचा टिळा लावून केला प्रेमाचा बनाव, विवाहित तरूणाचे युवतीवर लैंगिक अत्याचार