Pune Crime | जळगावमध्ये व्यावसायिकाची 12 लाखाची फसवणूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जळगाव येखील एका भंगार व्यावसायिकाची (Scrap Professionals) 12 लाखांची फसवणूक (Fraud) करुन फारार झालेल्या दोघांना पुणे गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Crime Branch Unit-1) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना जुलै महिन्यात घडली होती. गुन्हा केल्यानंतर आरोपी 5 महिने फरार होते. युनिट एकच्या पथकाने ही कारवाई (Pune Crime) शुक्रवारी (दि.18) साधुवासवाणी रोड (Sadhu Vaswani Road) येथे केली.

 

संतोष गुलाब खुडे Santosh Gulab Khude (वय-44), चंद्रकांत शिवाजी जाधव Chandrakant Shivaji Jadhav (वय-39 दोघे रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे जळगाव (M.I.D.C. Police Station Jalgaon) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

 

जळगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांची मदत मागितली होती. आरोपींचा शोध घेत असताना आरोपी संतोष खुडे हा आयकर भवन (Aaykar Bhavan) येथे असल्याची माहिती पोलीस अंमलदार अजय थोरात (Ajay Thorat) यांना समजली. तर पोलीस अंमलदार अमोल पवार (Amol Pawar) आणि इम्रान शेख (Imran Sheikh) यांना गुन्ह्यातील दुसरा आरोपी चंदु जाधव हा साधुवासवाणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Police Inspector Sandeep Bhosle),
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर (API Ashish Kawthekar), पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni),
पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Crime branch arrested two people who defrauded a businessman of 12 lakhs in Jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

Inflation | सोने-चांदी आणि पामतेल पुन्हा एकदा महागले

Pune-Goa Road Accident | पुण्यातील बुलेट रायडर तरुणाचा मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू