Pune Crime | खडकी बाजारमधील मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 10 जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खडकी पोलीस ठाण्याच्या (Khadki Police Station) हद्दीत चालणाऱ्या मटका जुगार अड्ड्यावर (Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) छापा टाकून 10 जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी 10 जणांवर महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.27) खडकी येथील मेहता बिल्डींग जवळील सार्वजनिक रोडवर करण्यात आली. (Pune Crime)

 

खडकी बाजार (Khadki Bazaar) येथे बेकायदेशीर मटका जुगार घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार घेणारे व मटका जुगार खेळणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेऊन 49 हजार 950 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. आरोपींना खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

 

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar), पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Shridhar Khadke), पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, अजय राणे, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे, अमित जमदाडे, महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे यांच्या पथकाने केली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title : –  Pune Crime | Crime Branch raids Matka gambling den in Khadki Bazar 10 people detained

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा