Pune Crime | कानाचा घेतला चावा, तोंडावर फेकली पातळ भाजी अन् स्क्रु डायव्हरने जखमी केले, कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मोबाईल हा आता सर्वांचा जीव की प्राण झाला आहे. मोबाईल जर बंद पडला तर लोक हैराण होतात. याच कारणावरुन दोघा भावांनी एका तरुणाच्या पाठीस व कानाचा चावा घेतला. त्याच्या तोंडावर जेवणातील पातळ भाजी टाकली. पाठीत स्क्रु ड्रायव्हरने मारुन जखमी केले. तसेच गॅरेजमधील गाड्या ढकलून देऊन त्यांचे नुकसान केले. या मागचे कारण ऐकून तुम्ही हैराण व्हाल. तरुणाने केवळ मोबाईल चार्जर (Mobile Charger) दिला नाही, म्हणून दोघा भावांनी हे कृत्य केले. चंद्रकांत रामदास माने Chandrakant Ramdas Mane (वय २२) आणि सूर्यकांत रामदास माने Suryakant Ramdas Mane (वय २२, दोघे रा. भेंडी चौक, आंबेगाव) यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याप्रकरणी अंगद वसंतराव पांचाळ Angad Vasantrao Panchal (वय ३४, रा. गारमाळ, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना आंबेगाव बुद्रुकमधील गेअरअप अ‍ॅटो गॅरेजमध्ये १२ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता घडली होती.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगद पांचाळ हे गेअरअप अ‍ॅटो गॅरेज येथे असताना चंद्रकांत माने याने त्यांच्याकडे मोबाईलचा चार्जर मागितला.
पण पांचाळ यांनी चार्जर दिला नाही.
यावरुन दोघा भावांनी त्यांच्याबरोबर भांडणे काढून त्यांच्या पाठीस व कानाचा चावा घेतला.
त्यांच्या तोंडावर जेवणातील पातळ भाजी टाकली.
गॅरेजमधील स्क्रू ड्रायव्हर घेऊन तो पांचाळ यांच्या पाठीत मारुन जखमी केले.
गॅरेजमधील गाड्या ढकलून देऊन त्यांचे नुकसान केले.
सूर्यकांत माने याने दगड घेऊन अंगावर धावून आला व त्याने फिर्यादी व मालक आशय हेमंत जोशी यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी (Pune Crime) दिली.
सहायक फौजदार चौधरी अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Crime News Of Bharati Vidyapeeth Police Station

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा