Pune Crime | 84 लाख रूपयांच्या फसवणूकप्रकरणी ओसवाल माय-लेकाविरूध्द FIR

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | व्यवसायासाठी मित्राकडून घेतलेले 84 लाख रुपये परत न करता फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth police station) दोघांवर फसवणूकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी मर्सिडीज गाडी (Mercedes car) देण्याच्या बहाण्याने 10 लाख रुपये घेऊन गाडी न देता फसवणूक केली आहे.

रोनक दिलीप ओसवाल (वय-29) आणि संगिता दिलीप ओसवाल (वय-58) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अरशद उस्मान तांबोळी (वय-32 रा. पद्मजी पार्क, सहावा मजला, भवानी पेठ, पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरशद आणि आरोपी हे मित्र आहेत.
आरोपींनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने संगनमत करुन अरशद याच्याकडून व्यवसायासाठी 84 लाख रुपये घेतले. तसेच मर्सिडीज गाडी देण्याच्या बहाण्याने 10 लाख रुपये घेतले.
मात्र, आरोपींनी व्यवसायासाठी घेतलेले 84 लाख रुपये परत केले नाहीत.
शिवाय पैसे घेऊन ही मर्सिडीज गाडी दिली नाही.
याप्रकरणी अरशद तांबोळी यांनी न्यायालयात (Court) धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशानुसार समर्थ पोलीस ठाण्यात सी.आर.पी.सी कलम 156(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मिरा त्र्यंबके (Police Sub-Inspector Mira Trimbake) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | FIR against Ronak Dilip Oswal and Sangita Ronak Oswal couple in fraud case of Rs 84 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Marathi Actor | ‘या’ मराठी अभिनेत्याची मुलगी बॉडीबिल्डिंग क्षेत्रात कमावतेय नाव

Chhagan Bhujbal | उड्डाणपूल उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने छगन भुजबळ ‘नाराज’; पालकमंत्री म्हणाले…

Pune News | खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीचा वाचला प्राण (Video)