Pune Crime | आर्मी पब्लिक स्कूलला 20 बॅट खरेदी करवयाच्या असल्याची सांगून व्यावसायिकाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आर्मी पब्लिक स्कूलला (army public school) 20 बॅट खरेदी करायची असल्याची बतावणीकरत व्यावसायिकाची 50 हजार रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी 22 वर्षीय तरूणाने अलंकार पोलीस ठाण्यात (alankar police station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे खेळाचे साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. यादरम्यान फिर्यादी यांना एका अनोळखी क्रमांकवरून फोन आला. त्याने “आर्मी पब्लिक स्कुल”मधून बोलत आहे. आमच्या शाळेसाठी 20 बॅट खरेदी करायच्या आहेत. त्याचे पैसे ‘युपीआय’द्वारे पाठविण्यात येईल, असे सांगितले. तसेच, फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना गुगल पेवर एक लिंक पाठवली आणि ती ‘व्हेरीफाय’ करा, असे सांगितले. फिर्यादीने ती लिंक ‘व्हेरीफाय’ केली. मात्र त्याचवेळी फिर्यादीच्या खात्यातून 50 हजार रुपये कट झाल्याचा मेसेज आला. त्यांनी संबंधित मोबाइलवर संपर्क साधला. पण तो होऊ शकला नाही. त्यानंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेत, तक्रार दिली. अधिक तपास अलंकार पोलीस (alankar police) करत आहेत.

हे देखील वाचा

Labour Code Rules | कोट्यावधी खासगी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! 1 ऑक्टोबरपासून बेसिक सॅलरी 15000 वरून वाढून 21000 रुपये होऊ शकते, जाणून घ्या नियम

Porn films case | उद्योजक राज कुंद्राच्या WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासे, या प्रकारचे झाली होती सुरूवात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Fraud of a businessman by telling Army Public School to buy 20 bats

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update