Labour Code Rules | कोट्यावधी खासगी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! 1 ऑक्टोबरपासून बेसिक सॅलरी 15000 वरून वाढून 21000 रुपये होऊ शकते, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Labour Code Rules | कोट्यवधी कर्मचार्‍यांसाठी मोदी सरकार (Modi Government) महत्वाचा निर्णय घेणार आहे. वृत्त आहे की 1 ऑक्टोबरपासून केंद्रातील मोदी सरकार लेबर कोडचे नवीन नियम (Labour Code Rules) लागू करू शकते. मीडिया रिपोर्टनुसार सरकारला 1 जुलैपासून लेबर कोडचे नियम लागू करायचे होते, परंतु राज्य सरकारांची तयारी नसल्याने आता 1 ऑक्टोबरपासून ते लागू करण्याचे टार्गेट ठेवले आहे.

1 ऑक्टोबरपासून लेबर कोडचे नियम लागू झाले तर कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी 15000 रुपयांवरून वाढून 21000 रुपये होऊ शकते. परंतु, टेक होम सॅलरी कमी होईल. तसेच कामाचे तास 8 वरून थेट 12 होऊ शकतात.

वेतनात होऊ शकतो बदल
लेबर कोडच्या नियमावरून आता लेबर युनियन मागणी करत होत्या की, कर्मचार्‍यांची किमान बेसिक सॅलरी वाढवून 15000 रुपयांवरून 21000 रुपये करण्यात आली पाहिजे. जर असे झाले तर कर्मचार्‍यांचे वेतन वाढेल. नवीन ड्राफ्ट रूलनुसार, मुळ वेतन एकुण वेतनाच्या 50% किंवा जास्त असायला हेव. यातून बहुतांश कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो.

टेक होम सॅलरी कमी होणार
बेसिक सॅलरी वाढल्याने PF आणि ग्रॅच्युटीसाठी कापले जाणारे पैसे वाढतील कारण यामध्ये जाणारे पैसे बेसिक सॅलरीच्या पटीत असतात. जर असे झाले तर टेक होम सॅलरी कमी होईल. मात्र, रिटायर्मेंटनंतर मिळणारे PF आणि ग्रॅच्युएटीचे पैसे वाढतील. लेबर युनियन याचा विरोध करत होत्या.

बदलतील अनेक नियम
संसदेने ऑगस्ट 2019 ला तीन लेबर कोड इंडस्ट्रियल रिलेशन,
कामाची सुरक्षा, हेल्थ आणि वर्किंग कंडीशन आणि सोशल सिक्युरिटीशी संबंधीत नियमात बदल केले होते.
हे नियम सप्टेंबर 2020 ला पास झाले होते.

Web Title :- Labour Code Rules | good news for private employees now your basic salary hike from 15000 to 21000 check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Arrested | अश्लिल चित्रपट प्रकाशित प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही