Pune Crime | पुण्यातील निर्माण कन्स्ट्रक्शनकडून 1 कोटीची फसवणूक, 6 जणांवर FIR

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  बांधकाम प्रकल्पात (construction project) घेतलेल्या फ्लॅटचा व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात करुन देखील फ्लॅटचा कायदेशीर ताबा दिला नाही. तसेच घराचा ताबा घेण्यासाठी जास्तीची रक्कम मागून जीवे मारण्याची धमकी देऊन एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) भंडारकर रोड येथील निर्माण कन्स्ट्रक्शनसह (nirman construction) सहा जणांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud police station) दोन वेगवेगळे गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी सुजीत शशीकांत अगरवाल Sujit Shashikant Agarwal (वय-48 रा. कुमार शांतीनिकेतन, बाणेर-पाषाण लिंक रोड, पुणे) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अगरवाल यांच्या फीर्यादीवरुन पोलिसांनी निर्माण कन्स्ट्रक्शन (अभिजीत कोर्ट, भांडारकर रोड, पुणे), अभिजीत रामनाथ गुंजाळ, विजया रामनाथ गुंजाळ (रा. गणंजय सोसायटी, कोथरुड),
अबोली रामनाथ गुंजाळ (रा. भांडारकर रोड), अकलकुंटे (रा. हिंगणे मळा, ससाणे नगर, हडपसर),
नखाते (रा. हिंगणे मळा, ससाणे नगर, हडपसर) यांच्याविरोधात महाराष्ट्र ठेविदारांचे हितसंबंध अधिनियम 3,4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार ऑगस्ट 2014 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजीत अगरवाल यांचे भाऊ विवेक अगरवाल (Vivek Agarwal) हे परदेशात असून त्यांना पुण्यात फ्लॅट घेयचा होता.
त्यामुळे फिर्यादी यांनी निर्माण कन्स्ट्रक्शनच्या हडपसर येथील औदुंबर प्रकल्पात (Audumbar project) फ्लॅट घेतला. यासाठी त्यांनी स्टेट बँकेचा डीडी दिला.
तसेच फ्लॅटचा दस्त दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 13 येथे नोंदवला.
तसेच फ्लॅट खरेदी करताना फ्लॅटचा टीडीएस (TDS) विवेक अगरवाल यांनी भरला.

 

आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या भावाचा फ्लॅटची खोटी कागदपत्रे तयार करुन ती खरी असल्याचे भासवून फ्लॅट बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवला.
फिर्यादी सुजीत अगरवाल यांनी फ्लॅटचा ताबा मागीतला असता आरोपींनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
तसेच फ्लॅटचा ताबा पाहिजे असल्यास आणखी 40 लाख रुपयांची खंडणी मागितली.
आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाच्या फ्लॅटची नासधुस करुन 99 लाख 62 हजार 720 रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Fraud of Rs 1 crore from Nirman Construction in Pune, FIR against 6 persons

Top Indian Billionaires | भारतात किती लोकांकडे आहे 100 कोटींपेक्षा जास्त, जाणून घ्याल तर व्हाल हैराण

Forest | शास्त्रज्ञांनी 50 वर्षांपूर्वी लावले होते ‘हे’ जंगल, आता येथे जाण्याच्या नावाने सुद्धा लोकांच्या उरात भरते धडकी

PM Modi | ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी केले PM मोदींचे कौतूक, म्हणाले – ‘चीनसाठी भारत एकमेव उत्तर’