Pune Crime | मालाची वाहतूक केल्यानंतरही पैसे न देता की 63 लाखांची फसवणूक; पी पी बाफना कंपनीचे संचालक प्रफुल्ल बाफना, योगेश बाफनासह 5 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कंपनीने माल वाहतुकीसाठी ट्रकची ऑर्डर दिल्यानंतर त्यानुसार माल पोहचविल्यानंतरही वाहतूक बिलाचे (Transportation Bill) पैसे न देता 63 लाख 59 हजार 400 रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी पी पी बाफना कंपनीचे (PP Bafna Company) संचालक प्रफुल्ल बाफना (Director Prafulla Bafna), योगेश बाफना (Yogesh Bafna) यांच्यासह 5 जणांवर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. (Fraud Case)

 

याप्रकरणी वेदप्रकाश जगदीश शर्मा Ved Prakash Jagdish Sharma (वय ७२, रा. उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रफुल्ल बाफना, योगेश बाफना, पी. पी. बाफना कंपनीचे लॉजिस्टिक व्यवस्थापक आशीष राजपूत (Logistics Manager Ashish Rajput), के व्ही आर कंपनी (KVR Company) आणि असोसिएट्स कार्गो कंपनी (Associates Cargo Company) सहायक विक्री व्यवस्थापक (Assistant Sales Manager) विजय ताकवणे (Vijay Takwane) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी पी बाफना व्हेंचर्स प्रा. लि. कंपनी प्रामुख्याने कागद, आणि कागद उत्पादन, प्रकाशन, छपाई व्यवसायात आहे. हा प्रकार 2 ऑगस्ट ते 11 डिसेबर 2019 दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाफना कंपनीचे प्रफुल्ल बाफना यांनी इतर आरोपींशी संगनमत करुन फिर्यादी यांना तुर्भे येथून केव्हीआर कंपनीच्या आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथे माल वाहतूकीची ऑर्डर दिली. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी 30 ट्रक माल वाहतूक केली. त्याचे बिल 33 लाख 55 हजार 800 रुपये इतके होते. दौंड तालुक्यातील (Daund Taluka) राहु येथून कोलकाता (Kolkata), गुवाहाटी (Guwahati) येथे माल वाहतूकीसाठी ऑर्डर दिली. त्यानुसार 12 ट्रकमधून मालाची वाहतूक केली. या वाहतूकीचे एकूण 27 लाख 13 हजार 500 रुपयांचे बिल व राहु येथून जे एन पी टी (JNPT) येथील वाहतूकीचे 2 लाख 90 हजार 100 रुपयांचे बिल असे एकूण 63 लाख 59 हजार 400 रुपयांची रक्कम न देता फिर्यादीची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 63 lakh without payment even after transporting goods; PP Bafna Company Director Prafulla Bafna, Yogesh Bafna and 5 others

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा