Pune Crime | धक्कादायक ! पत्नीच्या हत्येची शिक्षा भोगलेल्या पतीने अनैतिक संबंधातून आणखी एका महिलेची केली ‘गेम’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पत्नीच्या हत्येत शिक्षा भोगलेल्या आरोपी पतीने पुन्हा अनैतिक संबंधातून (Immoral Relations) एका महिलेची हत्या (Murder in Pune) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) आळेफाटा (Alephata News) येथील रानमळा येथे घडली. घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीला बेड्या (Arrested) ठोकल्या आहेत. सगुना गोरख केदार (Saguna Gorakh Kedar) (वय 40, रा. रानमळा) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर, संतोष बबन मधे (Santosh Baban Madhe) (वय 38, रा. रानमळा) असं आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, आरोपी संतोष मधे याला पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने मृत सगुना गोरख केदार (Saguna Gorakh Kedar) हिच्या सोबत अनैतिक संबंध निर्माण केले. तुरुंगातून सुटून आल्यानंतर आरोपीने मृत सगुणासोबात राहण्यास सुरुवात केली. तिच्या सोबत राहत असतांना आरोपी संतोषने तिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर तिला दररोज दारू पिऊन मारहाणही करत होता. (Pune Crime)

दरम्यान, आरोपीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून मृत सगुनाने राहण्याचे ठिकाण बदलेले. परंतु, आरोपीने तिथेही जात तिला मारहाण केली. घटनेच्या दिवशी आरोपीने पहाटेच्या सुमारास सगुणावर धारदार शस्त्राने वार केला. यात तिचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. यानंतर मृत सांगुणाचे वडील भाऊसाहेब रखमा दुधवडे (Bhausaheb Rakhma Dudhwade) यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर आळेफाटा पोलिसांनी (Alephata Police) घटना स्थळावर दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर आरोपीला अटक (Arrested) केली. दरम्यान, मृत महिलेसोबतचा वाद टोकाला गेल्याने तिची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | husband convicted of murdering wife commits another woman murder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ शानदार योजनेत लावा 7500 रुपये! करोडपती बनून व्हाल निवृत्त; जाणून घ्या युक्ती

 

Pune Crime | पुण्यात चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 4 वर्षाच्या मुलीचा विनयभंग; हडपसर परिसरातील घटना

 

Divyang Pension Yojana | कोणत्या लोकांना मिळतात ‘या’ पेन्शनचा लाभ, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती