Pune Crime | ‘तुला बोलायचे नसेल तर चालेल, मला दुसरी मुलगी पाहून दे’ ! घरात शिरुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सार्वजनिक रोडवर सायकल शिकत असलेल्या १६ वर्षाच्या मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तिला सातत्याने फोन करुन व व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज (WhatsApp Message) करुन तो त्रास देत होता. घरात कोणी नसल्याने पाहून त्यांच्या घरात शिरुन तुला माझ्यासोबत बोलायचे नसेल तर चालेल, मला दुसरी मुलगी पाहून दे, अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी खडक पोलिसांनी (Pune Police) सोहेल सय्यद Sohail Syed (वय २२, रा. गुरुवार पेठ) याच्यावर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत एका महिलेने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३०/२२) दिली आहे. हा प्रकार गुरुवार पेठेत मार्च २०२२ ते २९ ऑक्टोबर २०२२ दरम्यन घडला होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १६ वर्षाची मुलगी सार्वजनिक रोडवर सायकल शिकत असताना सोहेल व त्याचा मित्र दुचाकीवरुन तिच्या पुढे मागे फिरुन वेगवेगळे आवाज काढून तिला त्रास देत होता. तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तो तिला फोन करु लागला. तसेच व्हॉटसअ‍ॅप मेसेजही करुन वारंवार पाठलाग करीत असे. मात्र, फिर्यादीच्या मुलीने त्याला कधी प्रतिसाद दिला नाही. फिर्यादी यांच्या घरात कोणी नाही हे पाहून तो २९ ऑक्टोबर रोजी घरात शिरला. दरवाजा आतून बंद केला.
फिर्यादी यांच्या मुलीला तुला माझ्यासोबत बोलायचे नसेल तर चालेल,
मला दुसरी मुलगी पाहून दे, अशी धमकी दिली. या प्रकाराने ही मुलगी घाबरुन गेली होती.
तिने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार दिली असून
सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के (Assistant Police Inspector Mhaske) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | ‘If you don’t want to talk, it’s fine, let me see another girl’! Rape of a minor girl by entering the house

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा