Pune Crime | पुण्यात पैशासाठी गर्भश्रीमंत कुटुंबातील 17 वर्षीय तरूणास चौघांकडून बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खर्चासाठी पैसे देत असलेल्या एका गर्भश्रीमंत घरातील 17 वर्षीय मुलाला जबरदस्तीने दुचाकीवर नेत चार तरुणांनी त्याला लाकडी बांबूने बेदम मारहाण करत पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये दोघे पुण्यात (Pune Crime) उच्च शिक्षण घेत आहेत.

याप्रकरणी रोहन गुंजाळ Rohan Gunjal – Yerwada (वय 19, रा. येरवडा), चेतन रणपिसे Chetan Ranapise (वय 20),
आशुतोष भुजबळ Ashutosh Bhujbal (वय 19, भैरवनगर) या तिघांना अटक केली आहे. तर यातील अखिल पलांडे Akhil Palande (वय 26) हा पसार झाला आहे.
याबाबत 17 वर्षीय मुलाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (vishrantwadi police station) तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष भुजबळ हा एमबीए (MBA Student) करतो.
तर चेतन हा हॉटेल मॅनेजमेंटच शिक्षण (hotel management) घेत आहे.
तर रोहन हा एका चांगल्या ठिकाणी नोकरी करतो. यामधील तक्रारदार तरुणाची परिस्थितीत अत्यंत चांगली आहे. चौघेही त्याच्या ओळखीतील आहेत.
त्यांनी अधून मधून पैसे मागितल्यानंतर तक्रारदार तरुण त्यांना हजार- दोन हजार रुपये देत असत. त्यामुळे त्यांना पैसे घेण्याची चटक लागली होती.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आरोपींनी त्याला दुपारी धानोरी परिसरातील (dhanori pune) एका मंदिराजवळ नेले. त्याठिकाणी गेल्यास चेतन रणपिसेने कॉमन मैत्रिणीला फोनकरून आम्ही तक्रारदार मुलाला येथे आणले असल्याचे सांगत फोन बंद केला. त्यानंतर तक्रारदार मुलाला अखिल पलांडेने तुझ्याकडून दीड लाख रुपये घेण्यास सांगितले आहेत. दिड लाख रुपये देण्याची मागणी केली.
पण, मुलाने पैसे  नसल्याचे सांगितल्यानंतर लाकडी पाईपने मारहाण केली तसेच इतरांनी खाली पाडून लथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.
या मुलानं मारहाण होत असल्याने त्याच्या आईला फोन करून सांगितले.
यानंतर आरोपी त्याला सोडून पसार झाले. त्यानंतर तो घरी गेला. कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम हे करत आहेत.

Pune-Bangalore Highway | शुक्रवारपासून बंद असलेली पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक आज सुरु होण्याची शक्यता

Ration Card वर मिळतील अनेक फायदे, जर अजूनपर्यंत बनवले नसेल तर ‘या’ पध्दतीनं करा अर्ज, जाणून घ्या

Post Office च्या ’या’ योजनेत फक्त 1,000 रुपये जमा करा आणि दरमहिना 4,950 रुपये मिळवा !