Pune Crime | पुण्याच्या बोपदेव घाटात प्रेमी युगुलाला लुबाडले; तरुणीवर चाकूने वार करुन केले जखमी

पुणे : Pune Crime | फिरायला गेलेल्या युगुलापैकी तरुणीवर तिघा चोरट्यांनी वार करुन त्यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने लुटून नेण्याचा प्रकार बोपदेव घाटात घडला आहे. याप्रकरणी ताडीवाला रोड येथे राहणार्‍या एका 29 वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police) फिर्याद दिली आहे. ही घटना (Pune Crime) बोपदेव घाटात (bopdev ghat) सोमवारी रात्री 11 वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण आपल्या मैत्रिणीसह सोमवारी बोपदेव घाटात फिरायला गेले होते. रात्री उशिरापर्यंत घाटात फिरल्यानंतर ते खाली उतरत होते. यावेळी तरुणी नैसर्गिक विधीसाठी बाजूला गेली होती. यावेळी तिघा चोरट्यांनी तिच्यावर चाकूने वार करुन तिच्या गळ्यातील 25 हजार रुपयांची सोनसाखळी, फिर्यादी तरुणाकडील 1 हजार रुपये रोख व पाकिट असा 26 हजार 100 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Weather Updates | महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि MP सह देशाच्या ‘या’ भागांमध्ये कोसळणार जोरदार पाऊस, जाणून घ्या IMD चा ताजा अंदाज

PM Kisan | चुकीच्या पद्धतीने हप्ता घेणार्‍यांवर सरकारची कारवाई, राज्यांनी सुरू केली वसूली प्रक्रिया

Numerology and Career | स्वतःच्या जन्म तारखेवरून निवडा योग्य करियर, आकड्यांचा जीवनावर होणार परिणाम माहित आहे का?, जाणून घ्या

Baramati News | बारामतीतील दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून 75 कुटुंबीयांना गृहपयोगी वस्तूंचे किट

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update