Pune Crime | इंटिरीअर डिझाईनर महिलेने डिस्काऊंटचे आमिष दाखवून केली 7 लाखांची फसवणूक; विचारणा केल्यावर दिली आत्महत्येची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घराच्या फर्निचरचे काम दिले असताना नवीन एसी व सोफ्यावरील कपडे खरेदीत डिस्काऊंट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका इंटिरीअर डिझाईनर (Woman Interior Designers In Pune) महिलेने ६ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली. पैशांबाबत विचारणा केल्यावर तिने आत्महत्या (Suicide) करण्याची धमकी दिली. (Pune Crime)

 

याप्रकरणी शोनी सिद्धार्थ विर्दी (वय ४४, रा. रोहन मिथिला, विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पूर्वी रवीशंकर शुक्ला Purvi Ravishankar Shukla (वय २२, रा. सेंलेट, मगरपट्टा, मुळ छिंदवाडा) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २ नोव्हेबर २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

शोनी विर्दी यांना त्यांचे फ्लॅटचे इंटिरीअर डिझाईन व फर्निचरचे काम करुन घ्यायचे होते.
त्यासाठी त्यांनी जस्ट डायलवरुन माहिती घेतली.
त्यांना पूर्वी शुक्ला यांचा नंबर मिळाला. त्यांनी पूर्वी यांच्याशी संपर्क साधला.
तिने फिर्यादी यांना वेगवेगळे डिझाईनचे फोटो पाठवले. फर्निचरसाठी त्यांच्याकडून पैसे घेतले.
फिर्यादी यांच्या घराच्या फर्निचरचे अर्धवट काम केले. घरासाठी नवीन एसीवर डिस्काऊंट मिळत असल्याचे सांगितले.
तसेच सोफ्यावरील कापड खरेदी करण्याचे असल्याचे सांगून त्यांच्याकडून ६ लाख ९५ हजार रुपये घेतले.
मात्र, कोणतीही खरेदी केली नाही. काम अर्धवट ठेवले. याबाबत फिर्यादी यांनी फोन करुन विचारणा केली.
तेव्हा तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विर्दी यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Interior designer Purvi Ravishankar Shukla cheats Rs 7 lakh by showing lure of discount He threatened to kill himself if asked

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा