Pune Crime | वाईच्या सराईत चोरट्याकडून 3 मोटारसायकल जप्त; कोंढवा पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – Pune Crime|वाईहून पुण्यात येऊन मोटारसायकली चोरणाऱ्या सराईताला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अटक (Arrest) करुन त्यांच्याकडून चोरीच्या (Thift) 3 मोटारसायकली (Motorcycle) जप्त केल्या आहेत. ज्ञानेश्वर विजय जाधव (वय 23, रा. उडत्तरे, ता. वाई. जि. सातारा) असे या चोरट्याचे नाव आहे. Pune Crime | kondhwa police arrest criminal and recover 3 bikes

कोंढवा परिसरात (Kondhwa Police) वाहनचोरीचे (Vehicle theft) प्रमाण वाढले आहे. त्यादृष्टीने पोलीस शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश चिंचकर (Police Officer Ganesh Chinchkar) यांना माहिती मिळाली की, बोपदेव घाटात गारवा हॉटेलच्या जवळ संशयीतरित्या उभा असून त्याच्याकडील मोटार सायकलवर नंबर प्लेट नाही, अशी माहिती मिळाली.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे (Sub-Inspector of Police Prabhakar Kapure) व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी जाऊन जाधव याला पकडले. त्याच्याकडील मोटारसायकलची तपासणी केल्यावर ती कोंढव्यातून चोरीला गेली असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केली असता त्याने लोणंद आणि खंडाळा येथून दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 1 लाख 70हजार रुपयांच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

कोंढवा पोलीस (Kondhwa Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, हवालदार कुंभार, पोलीस अंमलदार सुशील धिवार, पांडुळे, मिसाळ, रत्नपारखी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Pune Crime | kondhwa police arrest criminal and recover 3 bikes 

हे देखील वाचा

Pune Crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून; पुणे स्टेशन परिसरातील घटना, प्रचंड खळबळ

Pune Crime | खंडणी न दिल्याने बिल्डरवर गोळीबार करणाऱ्या 4 जणांवर ‘मोक्का’

Pune News | जामिनावर बाहेर अससेल्या 13000 कैद्यांसाठी खुशखबर ! ‘तो’ पर्यंत त्यांना परत जेलमध्ये बोलावले जाणार नाही

AADHAAR Updates | तुमच्या ‘आधार’सोबत होऊ शकते फसवणूक, रोखण्यासाठी आहेत ‘या’ टिप्स; जाणून घ्या

Gold Price Today | सोने तेजीनंतर सुद्धा मिळत आहे 10 हजार रुपये स्वस्त, चेक करा 10 ग्रॅम गोल्डचे नवीन दर