Pune Crime | वीजेचा धक्क्याने मजूर ठार, ठेकेदार व जागा मालकाविरूद्ध FIR; जांभुळवाडीतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | इमारत बांधकामावेळी वीजेचा धक्का (Electric Shock) बसून मजुराचा मृत्यू (Labourer Death) झाल्याची घटना मंगळवारी (दि.11) जांभुळवाडीतील विराला एम रोड जैन मंदिराजवळ (Pune Crime) घडली आहे. कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेतल्याप्रकरणी ठेकेदार आणि जागामालक यांच्या विरूद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

 

गंग्या काल्या अमगोत Ganga Kalya Amgot (वय ३५ रा. तेलंगणा ) असे ठार झालेल्या मजूराचे नाव आहे. याप्रकरणी झुम्माबाई अमगोत Jhummabai Amgot (वय २० रा. कात्रज) यांनी तक्रार दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभूळवाडी परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. संबंधित बांधकाम करताना ठेकेदारासह जागा मालकाने कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नव्हती. परिसरातून एमएसईबी विभागाच्या (MSEB Department) विद्युत तारांचा प्रवाह सुरू असतानाही त्यांनी कामकाज सुरू ठेवले. त्यावेळी काम सुरू असताना गंग्या याचा विद्युत तारेला स्पर्श होउन खाली पडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे (PSI Avinash Dhame) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Laborer killed by electric shock, FIR against contractor and
site owner; Jambhulwadi incident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा