Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीची कारवाई ! स्वस्तात सोनं देण्याचे आमिष दाखवून दरोडा टाकणारी टोळी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पैशांची गरज आहे, स्वस्तात एक किलो सोनं (Gold) देतो असे सांगून दरोडा (Robbery) टाकणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB (Local Crime Branch) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी सोनं देण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन 8 लाख रुपयांची रोख रक्कम दरोडा टाकून नेली होती. हा प्रकार राजगड पोलीस ठाण्याच्या (Rajgad Police Station) हद्दीत गुरुवारी (दि.6) सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) मौजे किकवी गावच्या (Kikvi) हद्दीत (Pune Crime) घडला होता.

राजा रणुसिंग उर्फ टारझन आदिवाशी, रसुल कमलेश आदिवाशी, बिरकीस खंदेलाल आदिवाशी (सर्व रा. हरद्वा गाव, कटणी, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रीराम मनोजकुमार आसावा (Shriram Manojkumar Asava) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे ओळखीचा प्रेम नावाच्या व्यक्तीने त्यांना पैशांची गरज असल्याचे सांगून 10 लाखाची मागणी केली. त्या मोबदल्यात 1 किलो सोनं देतो असे सांगितले. सुरुवातीला 1.5 ग्रॅम सोन्याचा तुकडा खात्री करण्यासाठी दिला. तो खरा असल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादी सोने घेण्यास तयार झाले. आरोपींनी त्यांना पैसे घेऊन किकवी गावच्या हद्दीत बोलावून घेतले. त्याठिकाणी चार ते पाच जणांनी फिर्यादी आणि त्यांच्या साथिदाराला लाकडी दांडक्याने मारहाण करुन 8 लाख रुपये दरोडा टाकून नेले होते.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत असताना आरोपी भोसरी पोलीस ठाण्याच्या (Bhosari Police Station) हद्दीतील वडमुखवाडी (Vadamukhwadi) येथे लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागताच त्यांनी तेथून पळून जाऊ लागले.
पोलिसांनी आरोपींचा 5 किलोमीटर पाठलाग करुन दिघी (Dighi) येथे तिघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी इतर साथिदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपींना पुढील तपासासाठी राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे ग्रमीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite),
उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील (SDPO Dhananjay Patil)
यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Senior Police Inspector Ashok Shelke),
राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील (Police Inspector Sachin Patil) यांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे (API Sachin Kale), पोलीस उप निरीक्षक शिवाजी ननावरे (PSI Shivaji Nanavare), अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार शब्बीर पठाण, विजय माळी, प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार दत्तात्रय तांबे, अजय घुले, विजय कांचन, हनुमंत पासलकर, पोलीस हवालदार प्रमोद नवले, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, अमोल शेडगे, प्राण येवले, निलेश शिंदे, समाधान नाईकनवरे, महिला पोलीस हवालदार कांबळे, बांबळे, सुरेखा लोंढे, सुनिता मोरे, नंदा कदम, वाल्मीकी, शेलार,पुनम गुंड, सुजाता कदम-डेरे, तसेच राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नवसरे, पोलीस हवालदार तोडकर, धोंडे, राजिवडे, गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title :-  Pune Crime | LCB action of Pune Rural Police The gang that carried out the robbery by showing the lure of giving cheap gold

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | तिसर्‍या डोससाठी बुक करावा लागणार नाही ‘स्लॉट’, असा घेऊ शकता डोस; मुलांबाबत व्हॅक्सीन कंपनीने दिला ‘हा’ इशारा

 

Pune Crime | खराडीत 2 कुटुंबात झाली हाणामारी, 7 जणांवर गुन्हा ! भांडणामागचे कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण

 

Police Inspector Transfer | पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 11 पोलीस निरीक्षक, 2 सहायक पोलिस निरीक्षक, 9 उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या