Pune Crime | पुण्याच्या विश्रांतवाडीतील सराईत गुन्हेगार राज भवार व त्याच्या 7 साथीदारांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 111 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशान्वये शहरातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार राज रवींद्र भवार याच्यासह त्याच्या 7 साथीदारांवर मोक्का कारवाई केली आहे. आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत 111 आणि चालू वर्षात 48 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime) केली आहे.

टोळीप्रमुख राज रवींद्र भवार (वय 24), जयेश उमेश भोसले (वय 19, रा. पत्र्याची चाळ, धानोरी रोड, विश्रांतवाडी, पुणे), सुमित सुभाष साळवे (वय 19, रा. रामवाडी, पुणे), गौरव सुनील कदम (वय 22, रा. धानोरी रोड, विश्रांतवाडी, पुणे), अकबर आयुब शेख (वय 21, रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी) व तीन अल्पवयीन मुलांवर मोक्का कारवाई (Pune Crime) करण्यात आली आहे. जयेश भोसले आणि सुमित साळवे यांना खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून ते येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. टोळीप्रमुख राज भवार, गौरव कदम, अकबर शेख आणि एका अल्पवयीन मुलाचा पोलीस शोध घेत आहेत.

सराईत गुन्हेगार राज भवार याने साथीदारांच्या मदतीने विश्रांतवाडी, येरवडा, विमानतळ पोलीस ठाण्याच्या परिसरात खुनाचा प्रयत्न, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही. आरोपींनी पुन्हा गुन्हे केले आहेत.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का)
अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी
खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त (पूर्व) नामदेव चव्हाण यांना सादर केला होता.
या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे,
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर,
पोलीस निरीक्षक गुन्हे विजयकुमार शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम, पोलीस अंमलदार मनोज शिंदे,
सुनील हसबे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | MCOCA Action on criminal Raj Bhawar and his 7 accomplices in Vishrantwadi, Pune; Police Commissioner Amitabh Gupta’s 111th action till date

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत महिलेचा केला विनयभंग

Crime News | ज्वेलरी शाॅपमध्ये चोरट्यांचा गोळीबार; सोने आणि रोख रक्कम हिसकावून पसार