Pune Crime | पुण्यात महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, एकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात (Pune Crime) महावितरण (MSEDCL) कंपनीकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत (Power outage) करण्याची कारवाई सुरु आहे. महावितरण कडून पुण्यात (Pune Crime) सुरु असलेल्या कारवाई दरम्यान कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना कोंढवा येथे घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.25) सकाळी दहाच्या सुमारास ) शाह हाईट्स, भाग्योदय नगर, कोंढवा येथे घडली. याप्रकरणी एकावर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या रास्तापेठ विभाग अंतर्गत कोंढवा शाखा कार्यालयाचे कर्मचारी दशरथ अंबादास मुंडे (Dashrath Ambadas Munde)
हे सहकाऱ्यासमवेत गुरुवारी (दि. 25) शाह हाईट्स, भाग्योदय नगर, कोंढवा येथील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत होते.
यावेळी दोन थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करून त्यांनी वीजमीटर ताब्यात घेतले असता आरोपी इरशाद शाह (Irshad Shah) या व्यक्तीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.

 

तसेच ताब्यात घेतलेले मीटर त्याने परत घेतले. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी (Pune Crime) आरोपीविरुद्ध IPC 353, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास सुरु आहे.

 

Web Title : Pune Crime | MSEDCL employee beaten up in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | शिवसेनेसोबत पुन्हा मैत्री करणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टंच सांगितलं…

Transport Commissioner Avinash Dhakne | वाहन चालकांनो सावधान ! सिग्नल तोडल्यास, लायसन्स नसल्यास भारावा लागणार दुप्पट दंड !

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…