Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या अनेक दिवसांपासून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप आणि मनसे (BJP and MNS) यांच्यात युतीची चर्चा होत होती. तर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मागील आठवड्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तेथील फॅमिली फोटोही समोर आले होते. त्यामुळे आणखी युतीच्या चर्चेला उधाण आलं. राज ठाकरेंच्या भेटीवरुन देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एका मुलाखतीत बोलताना स्पष्ट सांगितलं आहे.

 

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीवर सविस्तर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मला मुख्यमंत्री उद्धवजींनी जेवायला बोलावलं तर मी स्वत: त्यांच्या घरी जाईल.
राज ठाकरे हे प्रभावी नेते आहेत. त्यांनी नवीन घर बांधलं. त्यानिमित्ताने मी त्यांना अभिनंदनाचा फोन केला.
त्यावेळी त्यांनी सांगितलं की, कोरोनामुळे त्यांनी काही कार्यक्रम केलेला नाहीये.
पण मित्रमंडळींना घरी जेवायला बोलावतोय. त्यामुळे तुम्ही आणि वहिणी घरी जेवायला या, असं निमंत्रण त्यांनी दिलं. म्हणून मी जेवायला गेलो.

 

पुढे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘आमच्या सगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. कारण राज ठाकरेंकडे माहिती खूप असते.
त्यांना सगळ्या विषयांचं ज्ञान चांगलं आहे. त्यांच्याशी गप्पा मारायला मज्जा येते. त्यामुळे मी त्यांच्याशी गप्पा मारल्या.
याचा अर्थ मी युती करण्यासाठी गेलो असा काही विषय नाही.
सध्यातरी भाजप पक्षाचं मत आहे की, आम्हाला स्वत:च्या हिंमतीवर लढायला हवं.
त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकाबाबत युतीबाबत चर्चाच झाली नाही, असं ते म्हणाले.

 

Web Title : Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis reveal what discussion between raj thackeray and him at shivtirtha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते म्हणाले – ‘ही लवकरच उर्फी जावेद…’

Anushka Sen | अनुष्का सेनची मालदीवमध्ये मस्ती ! बॅकलेस मोनोकनी आणि स्कूबा डायव्हिंग करत शेअर केले फोटो आणि व्हिडीओ

Omicron Variant | ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे चिंतेत भर ! दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले? आदित्य ठाकरे म्हणाले…