
Pune Crime | पुण्याच्या मांजरी खुर्दमध्ये तरूणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून, प्रचंड खळबळ
पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | मित्राचे हात उसने घेतलेले पैसे परत का करत नाही, असे विचारायला गेलेल्या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून (Pune Crime) करण्याचा प्रकार मांजरी खुर्द (manjari khurd) येथील स्मशानभूमीजवळ घडला.
विकास लक्ष्मण सोनवणे (वय ३१, रा. मांजरी खुर्द) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास सानवणे हा इलेक्ट्रिशन म्हणून काम करत होते.
आरोपींनी विकास याचा मित्र गायकवाड याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते.
आरोपी हे पैसे परत करत नसल्याने रविवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाला होता.
त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विकास आरोपींच्या घरी गेला.
त्यांना पैसे परत का करत नाही, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींबरोबर वाद झाला.
त्यातून पाच जणांनी विकासवर वार करुन त्याचा खुन केला.
लोणीकंद पोलीस अधिक तपास (Lonikand Police) करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Murder by attacking a young man with a sharp weapon in Manjari Khurd, Pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
PMRDA | 23 गावांसह संपूर्ण हद्दीच्या विकास आराखड्यावर पीएमारडीए ने मागविल्या हरकती सूचना
Vedika Shinde | 16 कोटींचे इंजेक्शन दिलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या वेदिका शिंदेचा मृत्यु
Latur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार