क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | सिमेंटची विट डोक्यात घालून दारु दुकानाच्या मॅनेजरचा खून, पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीतील वडगाव बुद्रुक (Wadgaon Budruk) येथील देशी दारु दुकानात व्यवस्थापक (Liquor Store Manager) म्हणून काम करणाऱ्या इसमाच्या डोक्यात सिमेंटची विट (Cement Bricks) घालून खून (Murder In Pune) केल्याची घटना घडली आहे. दिनकर सूर्यभान कोटमाळे (Dinkar Suryabhan Kotmale) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.16) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास शरद हॉस्पिटलच्या (Sharad Hospital) मागे प्रयेजा सिटी  (Prayeja City) रस्त्यालगत असणाऱ्या देशी दारुच्या दुकानात घडली. पोलिसांनी (Pune Police) तौशिब रफिक शेख (Toushib Rafiq Shaikh) याला ताब्यात (Pune Crime) घेतले आहे.

 

सिंहगड रोडवरील शरद हॉस्पिटलच्या मागे रामदास घुले (Ramdas Ghule) व अरुण घुले (Arun Ghule) यांचे देशी दारुचे दुकान आहे. या दुकानात मयत दिनकर सूर्यभान कोटमाळे (वय – 40 रा. चरवड वस्ती, वडगाव पठार – Wadgaon Pathar, पुणे) हे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास आरोपी तौशिब रफिक शेख (वय-24 रा. मारुती मंदिरामागे, आनंदनगर, वडगाव बुद्रुक -Wadgaon Budruk) हा दारु पिण्यासाठी दुकानात आला होता. त्यावेळी कोटमाळे आणि शेख यांच्यात वाद झाले. या वादातून आरोपीने तेथे असणारी सिमेंटची विट त्यांच्या डोक्यात घातली. तसेच गळा दाबल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये कोटमाळे यांचा जागीच मृत्यू झाला. (Pune Crime)

खुनाची घटना घडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार (ACP Sunil Pawar),
सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare) यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | murder of a liquor shop manager in sinhagad road of pune by throwing cement bricks on his head

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button