Pune Crime | पुण्यातील उद्योजक गायकवाड बाप-लेकास तब्बल ‘एवढया’ दिवसांची पोलिस कोठडी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | मोक्कानुसार दोनदा कारवाई झालेल्या औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश यांना न्यायालयाने 27 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली (Pune Crime) आहे. मोक्का न्यायालयाने न्यायाधीश ए. एन. शिरशीकर (MCOCA Judge A. N. Shirshikar) यांनी हा आदेश दिला.

पुणे पोलिसांनी (Pune Police) त्यांना बुधवारी रात्री कर्नाटक येथून अटक केली आहे.
त्यानंतर दोघांना आज येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (Nanasaheb Gaikwad) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड Ganesh Gaikwad (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड यांच्याविरूध्द सुनेच्या छळ केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (chaturshringi police station) गुन्हा दाखल आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात देखील गायकवाड बाप-लेकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे देखील त्यांच्यावर दाखल आहेत.
नानासाहेब गायकवाड हा टोळीप्रमुख असून त्याने कुटुंबातील सदस्य व साथीदारांची संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून विविध गुन्हे केले आहेत.

नानासाहेब गायकवाड, त्याचा मुलगा व कुटुंबाविरुद्ध त्यांच्या सुनेने कौटुंबिक छळाचा गुन्हा
चतुःशृंगी पोलिस ठाण्यात (chaturshringi police station) दाखल केला होता.
त्यांच्या आमदार होण्यामध्ये सुनेचा अडथळा ठरत असल्याचे एका उच्चभ्रू आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून त्यांनी सुनेचा छळ करण्याबरोबरच तिच्यावर अघोरी विद्येचा प्रयोग केला होता.
या घटनेनंतर गायकवाड कुटुंबाविरुद्धच्या अनेक प्रकरणांना वाचा फुटली होती.

नानासाहेब गायकवाड याची पत्नी नंदा गायकवाड यांना देखील कोठडी झाली आहे

 

Web Title : Pune Crime | Nanasaheb Gaikwad and Ganesh Gaikwad from Aundh, has been remanded in police custody till August 27

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Korean Glass Skin | कोरियन मुलींप्रमाणे त्वचा मिळवायची आहे का? तर ‘हे’ नक्की करा !

Anil Deshmukh | देशमुख पिता-पुत्रांनी ईडीला दाखवली पाठ, दाेघेही चौकशीसाठी गैरहजर

Bleach | ब्लीच नंतर चेहऱ्यावर जळजळ, खाज सुटण्यापासून आराम मिळवा; काही घरगुती गोष्टी वापरुन पाहा