Pune Crime News | खळबळजनक! पुणे जिल्ह्यातील ‘या’ बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत तब्बल 1 कोटी 73 लाखांचा अपहार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कंत्राटी मदतनिसाने ठेवीदार (Depositors) आणि खातेदार यांच्या (Account Holder) खात्यामधून तब्बल 1 कोटी 73 लाख अपहार (Embezzlement) केल्याचा खळबळजनक प्रकार बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank of Maharashtra) दौंड तालुक्यातील गोपाळवाडी शाखेत (Gopalwadi Branch) घडला आहे. हा प्रकार (Pune Crime News) समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कंत्राटी मदतनीसाने (Contract Helper) बँक अधिकाऱ्यांच्या संगणकाचा पासवर्ड वापरुन बनावट मुदत ठेव प्रमाणपत्र, पावत्या आणि दस्ताऐवज तयार करुन हा अपहार केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम तुकाराम भागवत (Parashuram Tukaram Bhagwat) असे कंत्राटी मतदनीसाचे नाव समोर आले आहे. हा प्रकार (Pune Crime News) 2018 ते 20 जुलै 2023 या कालावधीत घडला आहे. भागवत याने शाखेतील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणकाचे यूजर आयडी व पासवर्ड वापरुन ठेवीदर आणि खातेदारांची आर्थिक फसवणूक केली आहे.
परशुराम भागवत याने मुदत ठेव प्रमाणपत्र (Fixed Deposit Certificate) पुस्तकातील कोऱ्या कागदावर ठेवीदारांची सही घेतली. यानंतर ठेवीदारांना त्याची रक्कम व व्याज खात्यात जमा झाल्याचे भासवले. त्यानंतर ठेवीदारांना बनावट पावत्या देऊन फसवणूक (Fraud) केल्याचा खळबळजनक प्रकार केला आहे.
आरोपी परशुराम भागवत याने खातेदारांना बँकेची महा डबल योजना सुरु असल्याची माहिती दिली.
त्यानंतर गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत रक्कम दामदुप्पट होईल,
असे सांगून त्यांच्याकडून कोरे धनादेश घेतले. त्यानंतर त्याने खातेदारांना बनावट मुदत ठेव प्रमाणपत्र दिले. तसेच बँकेच्या संगणकीय प्रणालीचा दुरुपयोग करुन ठेवीदारांचे मुदत ठेव प्रमाणपत्र संमतीशिवाय परस्पर तोडले. त्यानंतर गुंतवणुकदारांची रक्कम स्वत:च्या व कुटुंबीयांच्या खात्यात जमा केली.
या अपहार प्रकरणी बँकेचे पुणे पूर्व विभागाचे उप क्षेत्रीय व्यवस्थापक (Deputy Regional Manager)
अमितचंदन चौधरी Amit Chandan Chaudhary (रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
परशुराम भागवत याच्याविरुद्ध अपहार करुन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी
गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपी
आणि त्याच्या इतर साथीदारांवर कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune News | आज “अजिंठ्या ” च्या लेण्यांनाही दाटून आलं…..
Maharashtra Assembly Session 2023 | ‘बारामती शेजारील मतदारसंघातही उभं राहायचं धाडस नाही’,
अजित पवारांची सभागृहात कबुली