Pune Crime News | जबरदस्तीने विवाह करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले 10 लाख; समर्थ पोलिस ठाण्यात सौरभ सुपेकर विरूध्द गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जबरदस्तीने विवाहाचा आग्रह करुन शरीरसंबंध ठेवून त्याचे अश्लिल व्हिडिओ (Pornographic Video) व्हायरल करण्याची धमकी देऊन एकाने तरुणीकडून तब्बल १० लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सौरभ सुपेकर Saurabh Supekar (रा. फ्लॅट नं. 102, विश्वकर्मा पद्मजी पर्ल सोसायटी, भवानी पेठ) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मंगळवार पेठेतील एका २२ वर्षाच्या तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३२/२३) दिली आहे. हा प्रकार मंगळवार पेठ, बावधन येथे डिसेबर २०२० पासून सुरु होता. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. सौरभ याने फिर्यादीस वेळोवेळी लग्न करण्याचा आग्रह केला. तिच्याबरोबर जबदस्तीने शरीरसंबध (Physical Relationship) ठेवले. तिच्याशी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी जबरदस्तीने रजिस्टार विवाह केला. त्यानंतर तो त्यांच्या संबंधाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. तिच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी करु लागला. तिच्याकडून त्याने १० लाख रुपये उकळले. फिर्यादी हिला आपल्या घरी राहण्यासाठी जबरदस्ती केली. तिने नकार दिल्यावर तिच्या कुटंबियांना शिवीगाळ करुन तिचा वेळोवेळी पाठलाग केला. शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली असून पोलिसांनी सौरभ सुपेकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.
Web Title :- Pune Crime News | 10 lakhs extorted by threatening to make the video viral
by forceful marriage; A case has been registered against Saurabh Supekar in Samarth police station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Buldhana ACB Trap | साखरेच्या पोत्यासह मागितली होती ४ लाखांची लाच; १ लाखांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी जाळ्यात
- Pune Bar Association Elections | पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. केतन कोठावळे तर
उपाध्यक्षपदी अॅड. विश्वजीत पाटील आणि अॅड. जयश्री चौधरी – बीडकर विजयी - Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी