Hasan Mushrif On Raju Shetti | राजू शेट्टींच्या आंदोलनावर मुश्रीफांची प्रतिक्रिया, ”मला रात्रीची झोप लागत नाही, कर्ज इतके….”

मुंबई : Hasan Mushrif On Raju Shetti | आम्ही राजू शेट्टी यांना यापूर्वी सांगितले होते की, कोल्हापुरातील साखर कारखाने (Sugar Factory) ऊसाला सगळ्यात जास्त आणि एकरकमी एफआरपी देतात. त्यामुळे त्यांच्यावर फार मोठा कर्जाचा बोजा आहे. दुसरीकडे तीन ते चार महिन्यांपूर्वी साखरेचे दर वाढलेत. कारखाने जर एफआरपी (FRP) कायदा पाळतात, विनाकपात एकरकमी पैसे देतात, प्रॉफिट शेअरिंगचा कायदा पाळतात, तर दरवेळी साखरेचे दर वाढले म्हणून असे आंदोलन करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरच्या कागलचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif On Raju Shetti) यांनी दिली आहे.

ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी ऐन दिवाळीत उपोषण करत आहेत. मंगळवारी सायंकाळी जयसिंगपूर येथे झालेल्या २२ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी म्हटले की, चालू हंगामात ऊसाला एकरकमी ३,५०० उचल मिळाल्याशिवाय ऊसाला कोयता लावू देणार नाही. शेट्टी यांच्या याच वक्तव्यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, राज्याच्या सीमेवर, कर्नाटकमध्ये, सांगली, सातारा आणि इतर ठिकाणी साखर कारखाने सुरू आहेत. इतर ठिकाणी २,८०० रुपये भावाने ऊसखरेदी सुरू आहे. परंतु, आंदोलनामुळे आमच्या जिल्ह्यातील साखर कारखाने बंद आहेत, हे दुर्दैवी आहे. मुश्रीफ यांना यावरील तोडग्याबाबत विचारले असता ते म्हणाले, त्याला नाईलाज आहे. (Hasan Mushrif On Raju Shetti)

हसन मुश्रीफ म्हणाले, मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक आहे. कारखान्यावरील कर्ज इतके वाढले आहे की,
मला आता रात्रीची झोप लागत नाही. एकरकमी एफआरपी दिल्यामुळे कारखान्यांना वारंवार कर्ज काढावे लागले आहे.
दुसऱ्या बाजूला तीन-चार महिन्यापूर्वी साखरेचे दर वाढले आहेत. केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीमुळे साखरेचे
दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा फटका या कारखान्यांना बसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून शाळेत गेला, मुलं चोरणारा समजून लोकांनी बेदम बदडलं; पुण्यातील घटना

Pune SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात जमावबंदी, विद्यापीठात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा आदेश