Pune Crime News | अग्निवीर म्हणून भरती करण्याच्या आमिषाने तोतया आर्मी इंटेलिजन्सच्या नावाखाली १६ तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | केंद्र सरकारने (Central Government) तात्पुरत्या धर्ती लष्करात (Army) अग्निवीर (Agnivir) म्हणून भरती होण्याची नवी योजना आणली आहे. अग्निवीर म्हणून लष्करात भरती करुन देतो, असे सांगून एका तोतयाने १६ तरुणांना लाखो रुपयांना गंडा (Cheating Case) घातला आहे. लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स (Military Intelligence) आणि पुणे पोलिसांनी (Pune Police) या तोतयाला कोईमतूर येथून अटक केली आहे. (Pune Crime News)

रणजितकुमार राजेंद्र सिंग Ranjit Kumar Rajendra Singh (रा. कोईमतूर) असे या तोतयाचे नाव आहे. याबाबत सांगली जिल्ह्यातील एका २१ वर्षाच्या तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४७२/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुण्यात वेटर म्हणून काम करतात. ते व त्याचे मित्र रेसकोर्स येथे आम्ही भरतीचा सराव करत होतो. त्यावेळी रणजीतकुमार हा भेटला. फिर्यादी यांच्या फिटनेसची तारीफ करुन आपण आर्मी इंटेलिजन्स मधून असून एएफएूसी येथे ऑन ड्युटी आहे. तुम्हाला आर्मीमधील एओसीमध्ये सिंकदराबाद येथे भरती करतो, असे सांगितले. त्यासाठी तुम्हाला प्रत्येकी साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील, ते पुढे मोठ्या साहेबांना देणार असून तुमचे काम करुन देतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले.त्यांना बनावट अपॉईन्टमेंट लेटर देऊन चौघांकडून १२ लाख ८० हजार रुपये घेतले. त्यांना सिंकदराबाद येथे बोलावून घेतले. प्रत्यक्षात तो भेटलाच नाही. तेव्हा फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी पुणे येथील मिलीटरी इंटेलिजन्स युनिटमधील अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना हकीकत सांगितली. (Pune Crime News)

वानवडी पोलीस व मिलिटरी इंटेलिजन्स यांनी कोईम्बतूर येथून रणजितकुमार याला अटक केली.
त्याच्याकडे चौकशी केल्यावर धाराशिव, लातूर, सातारा, कोल्हापूर, पुण्यातील आणखी १२ जणांना आर्मीत नोकरी
लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
पोलीस उपनिरीक्षक शितोळे (PSI Shitole) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Traffic Changes | सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूकीत बदल

Chandrashekhar Bawankule | बावनकुळेंचे पवार-ठाकरेंना आव्हान, ‘उदयनिधींच्या विधानाला समर्थन असावे, मान्य असेल तर…’