Pune Crime News | सोने तारणाच्या नावाखाली 2 लाखांना घातला गंडा; बँकेबाहेर उभे करुन केली फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) ठेवलेले सोने तारण तुमच्या फायनान्स कंपनीत (Finance Company) ठेवायचे आहे, असे सांगून त्यांच्याकडून २ लाख रुपये घेऊन एका तरुणाने आयआयएफएल फायनान्सला (IIFL Finance) गंडा (Cheating Case) घातला. कर्ज भरुन येतो, असे सांगून कंपनीच्या प्रतिनिधीला बँकेबाहेर उभे करुन तो पळून गेला. (Pune Crime News)

याप्रकरणी निलेश दिलीप सुवर्णाकार (वय २५, रा. एकता कॉलनी, आळंदी रोड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल खरमाटे (वय ३०, रा. रामनगर, पाथर्डी, टाकळी मनोर, जि. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आय आय एफ एल फायनान्स कंपनीत ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून नोकरी करतात. अमोल खरमाटे हा ७ जुलै रोजी त्यांच्या शाखेत आला. त्याने त्याचे सोने आयसीआयसीआय बँकेच्या घोले रोड शाखेत तारण ठेवले असून ते आपल्या शाखेमध्ये तारण ठेवायचे असे सांगितले. त्याच्याकडील तारण ठेवलेली पावती पाहून फिर्यादी यांनी त्यास मिळणारी तारण रक्कम सांगितले. त्यानंतर तो दोन दिवसात येतो, असे सांगून निघून गेला. (Pune Crime News)

त्यानंतर त्याने फोन करुन आज सोने तारण प्रक्रिया होईल का असे विचारले. फिर्यादी यांनी हो सांगितल्यावर शिवाजीनगर येथील संचेती चौकात बोलावले. त्याप्रमाणे फिर्यादी २ लाख रुपये घेऊन गेले. त्याने फिर्यादी यांना घोले रोडवरील आयसीआयसीआय बँकेत नेले. बँकेचे कर्ज भरण्यासाठी फिर्यादी यांनी त्याला बँकेबाहेर २ लाख रुपये दिले. तो आत गेला. फिर्यादी बाहेर त्याची वाट पहात बसले. बराच वेळ वाट पाहून ते बँकेत गेले. तेव्हा तो बँकेत दिसून आला नाही. फिर्यादीची नजर चुकवून तो परस्पर पळून गेला. शिवाजीनगर पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :   Pune Crime News | 2 lakhs in the name of gold collateral; Fraud committed outside the bank

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा