Maharashtra Rain Update | राज्यात काही ठिकाणी पाऊस, विदर्भात ‘यलो अलर्ट’; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Maharashtra Rain Update) पडत आहे. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके करपली आहेत. सध्या कोकणात (Konkan) मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई उपनगरांमध्ये चांगला पाऊस सुरू आहे. सोमवारी पुण्यात पावसाची रिपरिप दिसून आली.

विदर्भातील काही जिल्ह्यांतही पावसाने (Maharashtra Rain Update) हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी विदर्भात (Vidarbha) पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातही (Western Maharashtra) काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर पुढच्या 4 ते 5 दिवसात कोकणात मध्यम सरी बरसतील. तिथे पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे.

दिवसभराच्या विश्रांतीनंतर भंडारा (Bhandara) शहरात पुन्हा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी (Farmer) पावसाच्या प्रतीक्षेत होता. जुलै महिना सुरू होऊनही पावसाने हजेरी न लावल्याने शेतीची कामे विस्कळीत झाली होती. मात्र, दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून भात लागवडीने वेग घेतला आहे.

राज्यात पाणीटंचाईचे (Water Shortage In The State) संकट निर्माण झाले आहे.
पाऊस पडला तरी राज्यातील धरणांमध्ये (Dams) 29 टक्केच पाणीसाठा आहे.
राज्यातील सुमारे तीन हजार लहान-मोठ्या धरणांमधील पाणीसाठा अजूनही केवळ 29 टक्के आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि वीजनिर्मितीचे ठिकाण असलेल्या कोयना धरणातील (Koyna Dam)
पाणीसाठा अजूनही केवळ 15.86 टक्के आहे. राज्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

Web Title : Maharashtra Rain Update | rain in some part of maharashtra monsoon yellow alert for rain in vidarbha today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा