PM Kisan Yojana | शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच मिळणार पीएम किसानचा 14 वा हप्ता; जाणून घ्या

नवी दिल्ली : PM Kisan Yojana | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) दरवर्षी पीएम किसान सम्मान निधी योजने अंतर्गत (PM Kisan Yojana) सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करत आहे. हे 6 हजार रुपये (6 Thousand Rupees) प्रत्येकी 4 महिन्याला 2 हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यावर जमा होतात. आत्तापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता पुढचा 14 वा हप्ता कधी येणार याची चर्चा सुरु आहे. पण लवकरच 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हा हप्ता 14 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. याआधी 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 13 वा हप्ता जमा झाला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते हा हप्ता जारी केला होता. वास्तविक, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana), केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत (Financial Aid) करते. मोदी सरकार हे पैसे 2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये ही मदत जारी करते.

ज्या शेतकऱ्यांना अद्याप 13 वा हप्ता मिळाला नाही किंवा त्यांचे ई-केवायसी (E-KYC) अद्याप झालेले नाही, अशा शेतकऱ्यांना 14 वा हप्ता मिळणार नाही. तसेच जर एखाद्याच्या आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल तर त्याचा 14 वा हप्ताही थांबवला जाऊ शकतो. म्हणून, जर तुमची ई-केवायसी झाली नसेल, तर ती त्वरित करा.

ऑनलाईन ‘ई-केवायसी’ कसे अपडेट करा…

– ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
– या वेबसाइटवर ई-केवायसी पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
– ई-केवायसीच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल.
– त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
– यानंतर पीएम किसान निधीशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओ.टी.पी येईल.
– तो ओ.टी.पी प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
– या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे केवायसी काम पूर्ण होईल.

Web Title :  PM Kisan Yojana | pm kisan samman nidhi yojana 14th installment of pm kisan date dbt to farmers account

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा