Pune Crime News |  हनीट्रॅप प्रकरणातील 3 आरोपींना वारजे पोलिसांकडून 24 तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News |  हनीट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवून जबरदस्तीने 50 हजार रुपये खंडणी (Extortion) उकळणाऱ्या तिघांना वारजे पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. हनिट्रॅपला बळी पडलेल्या व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून 24 तासात तिघांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News) हा प्रकार 16 ऑगस्ट रोजी वारजे माळवाडी येथील स्वर्णा हॉटेल येथे घडला होता.

अक्षय राजेंद्र जाधव Akshay Rajendra Jadhav (वय-48 रा. कर्वेनगर, पुणे), शिवाजी गोविंदराव सांगोले Shivaji Govindrao Sangole (वय-34 रा. नऱ्हे, पुणे), भरत बबन मारणे Bharat Baban Marne (वय-45 रा. रामनगर, वारजे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) आयपीसी 392, 384, 420, 170, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 16 ऑगस्ट रोजी फेसबुक अकाउंटवरुन मनीषा जी या महिलेचा फोन आला. मनीषा जी नाव सांगणाऱ्या महिलेने फिर्यादी यांना वारजे माळवाडी येथील स्वर्णा हॉटेलमध्ये (Swarna Hotel) भेटण्यासाठी बोलावून घेतले. फिर्यादी हॉटेलमध्ये गेले असता आरोपींनी संगनमत करुन ते सायबर पोलीस (Cyber Police) असल्याची बतावणी केली. तसेच मुलींना ट्रॅप करतो, त्यांचे व्हिडिओ काढतो त्यामुळे केस करणार असल्याची धमकी फिर्य़ादी यांना दिली. आरोपींनी फिर्यादी यांना धमकी देऊन शिवीगाळ केली. तसेच केस करायची नसेल तर 50 हजार रुपयांची खंडणी मागून फिर्यादी यांना एटीएम मधून 50 हजार रुपये काढून देण्यास भाग पडले. तसेच त्यांच्या खिशातून साडेतीन हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अमोल सुतकर (Amol Sutkar) यांना माहिती मिळाली की एक आरोपी पुन्हा स्वर्णा हॉटेल येथे आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अक्षय जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्या इतर दोन साथीदारांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिवाजी सांगोले आणि भरत मारणे या दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा 24 तासात उघडकीस आणला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ए.बी. ओलेकर (API A.B. Olekar) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil),
पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), कोथरुड विभागाचे (Kothrud Division)
सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (Senior PI Sunil Jaitapurkar),
पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni),
तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे (PSI Rameshwar Parve),
पोलीस अंमलदार अमोल राऊत, अमोल सुतकर, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे,
अजय कामठे, राहुल हंडाळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | आदिवासी विकास प्रकल्पाच्या लेखाधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीकडून अटक