Pune Crime News | तरुणीसोबत अश्लिल चाळे करुन विनयभंग, हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल; येरवडा येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लहान बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणीसोबत अश्लिल चाळे करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याणीनगर येथील हॉटेल एलरो (Hotel Elro Kalyaninagar) च्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.9) रात्री दीड ते दोनच्या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत सोमवार पेठेत राहणाऱ्या 30 वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार एलरो हॉटेलचा मॅनेजर झेवियर जेम्स (Hotel Manager Xavier James) याच्यावर आयपीसी 354, 323, 504, 506/2 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या लहान बहिणीचा गुरुवारी वाढदिवस होता.
तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्यासोबत मानलेला भाऊ आणि एक मैत्रिण कल्याणीनगर
येथील हॉटेल एलरो येथे गेल्या होत्या. त्यावेळी हॉटेलचा मॅनेजर झेवियर जेम्स याने फिर्यादी यांच्यासोबत
अश्लिल चाळे करुन स्त्रि मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत
नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (PSI Gaikwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

The Archies Trailer | जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा ट्रेलर झाला रिलीज, सुहाना खान सोबतचं खुशी कपूर दिसणार दमदार भूमिकेत !

ACB Demand Trap News | 1 लाखाची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील क्लास वन अधिकार्‍यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल

Pune Crime News | कार्य़ालयातील दिव्यांग महिलेचा विनयभंग, विद्युत पारेषण कंपनीच्या अधीक्षक अभियंतासह तिघांवर FIR