Pune Crime News | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | तुझ्यामुळे वाटोळे झाले असे म्हणून सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

विजयकुमार बबरुवान शिंदे (वय ४२), बबरुवान शिंदे (वय ७०) आणि आयोध्या शिंदे (वय ६०, सर्व रा. कुबेरा संकुल हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अनिता विजयकुमार शिंदे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. हा प्रकार २०१३ पासून ११ मार्च २०२३ दरम्यान घडला. याप्रकरणी देविदास बाबुराव मणचुके ( रा. बीड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ४१३/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता हिचा विवाह विजयकुमार शिंदे याच्याबरोबर झाला होता.
लग्नानंतर पती व सासूसासर्‍यांनी वेळोवेळी शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक छळ सुरु केला.
तिला तुझ्यामुळेच माझे वाटोळे झाले आहे. तू मरुन गेलीस तर माझ्या पाठीमागची पिडा निघून जाईल एकदाची
असे बोलून तिचा छळ केला गेला. या छळाला कंटाळून अनिता हिने ११ मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले (API Thorbole) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | A case has been registered in the Hadapsar police station against three people including the husband in the case of the suicide of the married woman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime News | म्हशीचा धक्का लागल्याने विहिरीत पडून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू; कोल्हापूरमधील घटना

Subsidy For Onion | शेतकर्‍यांना दिलासा ! कांद्याला प्रतिक्विंटल 300 रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Beed Accident News | वाहनाने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या 70 वर्षीय आईचा मृत्यू