Pune Crime News | पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; सफाई कामगार महिलेकडे शरीर सुखाची केली मागणी

पुणे : Pune Crime News | सफाई कामगार असलेल्या विधवा महिलेकडे शरीर सुखाची मागणी करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक (PMC Health Inspector), ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

आरोग्य निरीक्षक मंगलदास माने (Mangaldas Mane), ठेकेदार शिवाजी सुळ, आणि संजय वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बिबवेवाडीतील एका ४० वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६४१/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत.
फिर्यादी या असहाय व विधवा असल्याचे माहिती असताना मंगलदास माने याने त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी
करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच पैशांची मागणी केली. त्या सुट्टीवरुन १० एप्रिल रोजी परत आल्यावर
हजर होण्याची चिठ्ठी घेण्यासाठी ठेकेदार शिवाजी सुळ याच्याकडे गेल्या होत्या.
त्यावेळी त्याने फिर्यादी यांना तू माने साहेबांकडे जा, तुम्ही जातीवर जाणार असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली.
याबाबत त्यांनी या दोघांविरुद्ध तक्रार अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी संजय वाघमारे याने धमकी दिली.
पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त शिरगावकर (ACP Shirgaonkar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Mohan Joshi – Shivaji Nagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्थानक 15 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा मुख्य मंत्र्यांना अडवू; माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा

IPS Ritesh Kumar-Sasoon Hospital | ससूनमधील गार्डवर वरिष्ठ पोलिसांची निगराणी, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले ‘हे’ आदेश

Chandrakant Patil – Pune Guardian Minister | पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Maharashtra Govt-Pune PMC | आरोग्य, शिक्षण विभागाला पूर्णवेळ प्रमुख नसताना लेखा व वित्त विभागासाठी शासनाने अतिरिक्त मुख अधिकारी नेमला

NHRC On Deaths In Govt Hospitals In Maharashtra | राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल, राज्य सरकार व मुख्य सचिवांना नोटीस