पुणे : Pune Crime News | ऑनलाईन अॅपद्वारे ओळख झाल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकून शारीरीक संबंध (Physical Relation) प्रस्थापित केले. त्यानंतर तिने आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. बदनामी करण्याची व आत्महत्या करुन (Defamation And Suicide) गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी (Extortion Case) मागण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी येरवडा येथील एका ३२ वर्षाच्या तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुंबईतील कळंबोली येथील एका ३० वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२१पासून सुरु होता. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांची स्टार मेकर या ऑनलाईन अॅपद्वारे
ओळख झाली. त्यानंतर तिने फिर्यादींना प्रेमाच्या जाळ्यात पाडले.
त्याच्या कल्याणीनगर येथील घरी तिचे येणे जाणे सुरु झाले.
त्यातून त्याचे सोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर त्याची फसवणूक करुन फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांचा मानसिक छळ केला. फिर्यादी यांचे ऑफिसमधील लोकांकडे व नातेवाईकांकडे बदनामी करेल, तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार करुन तुला व तुझ्या घरच्यांना कोणत्याही गुन्ह्यात अडकवून टाकेन, मी आत्महत्या करेल, अशी धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली. फिर्यादी यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे शेवटी या तरुणाने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | A form of extorting money from a young man by threatening him with a love trap; A case has been registered against a young woman in Mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mallika Sherawat | मल्लिकाने अंदमान येथील ‘ताज’ हॉटेलमधील बोल्ड फोटो केले शेअर; चाहते झाले घायाळ