Pune Crime News | मैत्रिणीने लावली सिगारेट आणि गांजाची सवय, बॉयफ्रेंडने केले असे काही की तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आयुष्यात चांगले मित्र असणे आवश्यक आहे. परंतु ते जर वाईट मार्गाने नेत असतील तर होत्याचे नव्हते कधी झाले हे समजत देखील नाही. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. मैत्रिणीला सिगारेट (Cigarettes) आणि गांजाचे व्यसन (Marijuana) लावले. तर तिच्या बॉयफ्रेंडने (Boyfriend) संशय घेऊन तिचा मोबाईल घेत मित्रांसमोर शिविगाळ केली. याच रागातून एका तरुणीने टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Committed Suicide) केली. हा प्रकार (Pune Crime News) 1 फेब्रुवारी 2023 रोजी विमाननगर परिसरात घडला आहे. याप्रकरणी बॉयफ्रेंड आणि मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी मयत मुलीच्या 49 वर्षीय वडिलांनी शनिवारी (दि.18) विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार साईराज (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) आणि मैत्रिणीविरुद्ध आयपीसी 306, 323, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर धार्मिक विधी करण्यासाठी फिर्यादी हे अमृतसर (Amritsar) येथे गेले होते. तेथून आल्यानंतर शनिवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ बॉयफ्रेंड आणि तिच्या मैत्रिणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची मयत मुलगी हे एकमेकांचे मित्र-मैत्रिणी आहेत. आरोपी मैत्रिणीने फिर्यादी यांच्या 21 वर्षीय मुलीला सिगारेट व गांजा पिण्याचे व्यसन लावले. तर मयत तरुणीचा बॉयफ्रेंड साईराज याने तिच्यावर संशय घेतला. तिचे इतर मुलांसोबत संबंध असल्याचा संशय घेऊन त्याने फिर्यादी यांच्या मुलीकडे तिचा मोबाईल मागितला. मात्र तिने मोबाईल देण्यास नकार दिला.

यावरुन साईराज याने फिर्य़ादी यांच्या मुलीला मित्रांसमोर शिवीगाळ करुन मारहाण केली.
तसेच तिचा मोबाईल हिसकावून घेतला.
याचा राग आल्याने फिर्यादी यांच्या मुलीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
मयत मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यावर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | A girlfriend started a cigarette and marijuana habit, something a boyfriend did or an extreme step taken by a young woman; Shocking types in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Masuta Marathi Movie | विविध सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारा ‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Pune Crime News | फुरसुंगीत राडा ! गाड्यांवर, घरांवर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण; 7 जणांवर FIR

Harmanpreet Broke Rohit Record | हरमनप्रीत कौरने मोडला रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय