Pune Crime News | खडकीत कोयता गँगचा राडा, जुन्या भांडणातून दोन तरुणांवर कोयत्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जुन्या भांडणाचा राग मनात धरुन चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. तर एका तरुणाच्या हातावर कोयता मारून परिसरात दहशत निर्माण केली. हा प्रकार खडकी येथील पडाळ वस्ती येथे 13 नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत अक्षय दिलीप गायकवाड (वय-26 रा. गवळीवाडा, खडकी बाजार, पुणे) याने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. तर मांडा उर्फ शुभम कवाळे, सॅम्युअल पाटोळे व इतर दोन साथीदारांवर आयपीसी 307, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय गायकवाड हे त्यांचे मित्र निलेश शिगवन, किशन ठाकुर, पप्पु तायडे, सचिन खानझोडे व सोनु डोके हे पडाळ वस्ती येथे कबुतरे पाहण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना ते एका पानटपरीवर थांबले होते. त्यावेळी फिर्य़ादी अक्षय याचे ओळखीचे आरोपी त्याठिकाणी आले. आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी शुभम कवाळे याने फिर्यादीचा मित्र निलेश शिगवन याला ‘इथे कशाला आलास’ असे विचारले. (Pune Crime News)

त्यावेळी निलेश याने ‘माझे घर इथेच आहे मी काय येवु शकत नाही का’
असे म्हणाला असता सॅम्युअल पाटोळे याने त्याच्याकडील लोखंडी कोयता निलेश
याच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.
तर शुभम कवाळे याने फिर्यादी अक्षय याच्यावर कोयत्याने वार केला. मात्र,
त्याने वार चुकवल्याने कोयता हाताला लागल्याने गंभीर दुखापत झाली.
आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या इतर मित्रांना शिवीगाळ करुन मोठ मोठ्या ओरडून हातातील कोयते हवेत फिरवून मध्ये आला तर संपवून टाकण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | कोंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 56 वी स्थानबध्दतेची कारवाई

Pune Crime News | पुणे शहरात सोनसाखळी चोर सक्रीय, भाऊबीजेला दोन महिलांचे दागिने हिसकावले