Pune Crime News | बांगला देशातील अल्पवयीन मुलीला बुधवार पेठेत लावले वेश्या व्यवसायाला; मुलीची सुटका करुन कुंटणखाना मालकिनीसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | ब्युटी पार्लरचे (Beauty Parlor) काम देतो, असे सांगून बांगला देशातून (Bangladesh) एका अल्पवयीन मुलीला पुण्यात आणून तिला वेश्या व्यवसायासाठी (Prostitute Business) विकल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील दोन वर्षांपासून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. या प्रकरणी कुंटणखाना मालिकिणीसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

कुंटणखाना (Kuntankhana) मालकिण डोल्मा राजू तमांग Dolma Raju Tamang (वय ५५, रा. बुधवार पेठ), मारिया ऊर्फ सोनी आणि एका पुरुषावर गुन्हा दखल केला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या (Social Security Department) पोलीस हवालदार मनिषा पुकाळे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraaskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६९/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्युटी पार्लरचे काम देतो, असे सांगून बांगला देशीय महिला दलाल
मारीया ऊर्फ सोनी हिने बांगला देशातील ढाका येथील एका १७ वर्षाच्या मुलीला विना परवाना भारतात आणले.
तिला सोनी हिने एका नेपाळी पुरुषाच्या हवाली केले. त्याने पुण्यात आणून कुंटणखाना मालकीण डोल्मा तमांग
हिच्याकडे ठेवले. तिच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. याची सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली़ त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून या तरुणीची सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर (PI Anita Hivarkar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन !
दि. २४ सप्टेंबर रोजी होणार उद्घाटन

पुणे : सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची दीड कोटींची फसवणूक, प्रचंड खळबळ