Pune Crime News | पोलीस वसाहतीमधून पोलिसाची दुचाकी चोरीला, पोलीस वसाहतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | चोरट्यांनी पोलीस वसाहतीमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरुन नेल्याचा (Bike Stolen) प्रकार उघडकीस आल्याने पोलीस वसाहतीच्या (Police Colony) सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरट्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) सर्व्हेलन्स पथकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी 45 हजार रुपये किंमतीची होन्डा कंपनीची युनिकॉर्न (MH 12 HH 7533) गाडी चोरून नेली. (Pune Crime News)

 

याबाबत सचिन बबन शिंदे (वय-35 रा. विश्रांतवाडी पोलीस वसाहत, येरवडा-Vishrantwadi Police Colony, Yerawada) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.21) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) सचिन शिंदे यांनी सोमवारी (दि. 20) रात्री साडेअकराच्या सुमारास ते राहत असलेल्या बिल्डींगच्या समोर त्यांची दुचाकी पार्क केली होती. मंगळवारी सकाळी कामावर जाण्यासाठी ते दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी गाडीचा शोध घेतला मात्र गाडी सापडली नाही. अखेर येरवडा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली.

 

पोलीस वसाहतीत सीसीटीव्ही बसवण्याची मागणी
विश्रांतवाडी पोलीस वसाहतीमध्ये अनेक पोलिसांची कुटुंबीय राहत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेच्या (Security) दृष्टीने कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा, नियोजन पोलीस विभागामार्फत अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले नाही. पुणे पोलिसांकडून (Pune Police) सुरक्षेच्या दृष्टीने खाजगी सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV), सुरक्षा यंत्रणा, सिक्युरिटी गार्ड नेमण्याच्या सूचना केल्या जातात. मात्र, पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप याठिकाणी राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

पोलीस वसाहतीमध्ये राहणारे 50 टक्के अंमलदार हे दिवस/रात्र पाळीस असतात पोलीस अंमलदारांकडून गुन्हेगारांवर कारवाई केली जाते.
याचा राग मनात धरुन पोलीस अंमलदार यांच्या वाहनाचे नुकसान करणे, पेट्रोल चोरणे, घराच्या खिडक्यांच्या काचा फोडणे असे प्रकार घडत असतात.

 

तसेच पोलीस वसाहतीच्या परिसरात झाडे झुडपे वाढल्याने अस्वच्छता आहे.
वाढलेल्या झाडा झुडपांच्या मागे लपून राहून जवळच्या झोपडपट्टीमधील मुले वाहनांमधील पेट्रोलची चोरी करतात.
हे करत असताना वाहनांचे देखील नुकसान करतात.
त्यामुळे अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलीस वसाहतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत.
यामुळे असे प्रकार घडणार नाहीत.
अशी मागणी वसाहतीत राहणाऱ्या पोलीस अंमलदार आणि त्यांच्या कटुंबियांकडून होत आहे.

 

Web Title :- Pune Crime News | A police bike was stolen from the police colony, the security issue of the police colony is on the agenda

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Peth Bypoll Election | ओबीसींच्या प्रश्नानाकडे भाजपचे दुर्लक्ष – विजय वडेट्टीवार

Hera Pheri 3 |अखेर पुन्हा धुमाकूळ घालण्यासाठी राजू, शामसोबत बाबू भैय्या सज्ज; ‘हेरा फेरी 3’ च्या शूटिंगला झाली सुरुवात

Pune PMC News | सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय; महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव