ACB Trap News | लाच घेताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह खाजगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune ACB Trap | Operators of civic facilities centers caught in anti-corruption net while taking Rs 4,000 bribe for providing caste certificates
File Photo

धाराशिव : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देऊन त्रास देवु नको असे सांगण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्वीकारताना धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.16) करण्यात आली. दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Bribe Case)

पोलीस शिपाई तानाजी त्रिंबक तांबे (वय 28), पोलीस शिपाई रणजित अनिल कासारे (वय 31), खाजगी ईसम पवन राजेंद्र हिंगमिरे (वय 26, रा. झिन्नर, ता. वाशी, जि. धाराशिव) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. याबाबत 39 वर्षीय व्यक्तीने धाराशिव एसीबीकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्याविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.
पोलीस शिपाई तानाजी तांबे यांनी तक्रारदार यांना तुमच्या विरुद्ध 107 प्रमाणे प्लेन चॅप्टर/किरकोळ कारवाई करण्यासाठी मी बिट अंमलदार यांना सांगितले होते. त्यामुळे त्यांनी किरकोळ कारवाईचा रिपोर्ट पाठवला आहे. त्या बदल्यात व तक्रारदार यांच्या पत्नीला समजावून सांगून तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देऊन त्रास देवु नको असे सांगण्यासाठी तांबे यांनी लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी धाराशिव एसीबीकडे तक्रार केली.

एसबीच्या पथकाने लाचमागणी पडताळणी केली असता तानाजी तांबे यांनी पोलीस शिपाई रणजित कासारे यांच्या मार्फत
दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सापळा कारवाई दरम्यान तानाजी तांबे याने लाचेची रक्कम
खाजगी इसम पवन हिंगमिरे यांच्याकडे देण्यास सांगितले. हिंगमिरे याला तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये
लाच स्वीकारल्यानंतर पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. यानंतर तांबे आणि कासारे यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींवर वाशी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | पंतप्रधानांवर शरद पवारांची जोरदार टीका, ”मोदी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी उपवास…”

Bacchu Kadu | बच्चू कडूंनी मराठा आरक्षणासंबंधी दिली महत्वाची माहिती, ”सरकारकडून मसूदा तयार, आता…”

न्याती कंपनीच्या ध्यान मंदिराच्या घुमटावरुन पडून कामगाराचा मृत्यू, कॉन्ट्रॅक्टरवर FIR

पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला अटक

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, ”सरकारकडून माझ्यावर डाव, मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि…”

PCMC Water Supply | पिंपरी चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

Total
0
Shares
Related Posts