Pune Crime News | घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराने बदलली गुन्ह्याची पद्धत, कोंढवा पोलिसांनी केला पर्दाफाश; 22 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यासह इतर शहरात घरफोडी (House Burglary) करणाऱ्या अट्टल चोरट्याला कोंढवा पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. आरोपीने गुन्हा करण्याची पद्धत बदलली मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून त्याचा पर्दाफाश झाला आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal) असून त्याच्यावर 150 घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. कोंढवा पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime News) थेऊर फाटा येथे त्याच्या राहत्या घराजवळ सापळा रचून केली. आरोपीकडून गुन्ह्यातील 22 लाख 20 हजार रुपये किमतीचे 37 तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) जप्त केले आहे. संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी Sangat Singh Ajmer Singh Kalyani (वय-40 रा. थेऊर रोड, गडबे कॉर्नर, लोणी काळभोर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.(Pune Crime News)

कोंढवा खुर्द येथील कुबेरा पार्क येथील फ्लॅटमध्ये भरदिवसा घरफोडी झाली होती. या गुन्ह्यातील आरोपीचा कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमदलात शोध घेत होते. आरोपीने ओळख पटू नये यासाठी तोंडाला रुमाल बांधुन, डोक्यावर टोपी घालून गुन्हा केला होता. (Pune Crime News) पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना आरोपी कोणत्या मार्गाने आला व गुन्हा केल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला याचा तपास केला.

200 सीसीटीव्हीची तपासणी

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथकातील पोलीस अंमलदार सुहास मोरे, राहुल थोरात, जयदेव भोसले, राहुल रासगे यांनी तब्बल 200 सीसीटीव्हीची पाहणी केली. पोलिसांनी आरोपीचा माग काढला असता तो थेऊर फाटा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी थेऊर फाटा येथे त्याच्या घराजवळ सापळा रचून ताब्यात घेतले.

150 गुन्हे दाखल 15 गुन्ह्यात फरार

आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून हडपसर (Hadapsar Police Station), बिबवेवाडी (Bibwewadi Police Station), सासवड (Saswad Police Station), अलंकार (Alankar Police Station), लोणीकंद (Lonikand Police Station), खेड (Khed Police Station), कोथरुड (Kothrud Police Station), दत्तवाडी (Dattawadi Police Station), पंढरपुर (Pandharpur Police Station), सिंहगड रोड (Sinhagad Road Police Stations), वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) दाखल असलेल्या 15 गुन्ह्यात फरार होता. तसेच त्याच्यावर यापूर्वी 150 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

गुन्ह्याची पद्धत बदलली पण…

आरोपी संगतिसिंग कल्याणी पूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी चे गुन्हे साथीदारांच्या मदतीने करत होता. मात्र, त्याने गुन्हा करण्याची पद्धत बदलली. तो सध्या दिवसा घरफोडी करीत होता. तसेच तो साथीदाराला न घेत गुन्हा करत होता. आरोपीने गुन्ह्याची पद्धत बदलली मात्र पोलिसांनी योग्य तपास करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

5 गुन्ह्यातील 22 लाखांचा ऐवज जप्त

आरोपीकडून कोंढवा पोलीस ठाण्यातील-2. मार्केट यार्ड (Market Yard Police Station), बिबवेवाडी आणि
वानवडी पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील 22 लाख 20 हजार रुपये किमतीचे
37 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे
(ACP Shahuraje Salve) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे
(Senior PI Santosh Sonawane), पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle),
पोलीस निरीक्षक संदीप भोसले (PI Sandeep Bhosale) यांच्या सुचनेनुसार तपास पथकाचे
साहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Suravse) पोलीस अंमलदार अमोल हिरवे, सुहास मोरे, राहुल थोरात,
जयदेव भोसले, विकास मरगळे, राहुल रासगे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, राहुल वंजारी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार अ‍ॅक्शन मोडवर, 10 लाखाची लाच घेणार्‍या बडया अधिकार्‍याची हकालपट्टी